Nashik News : जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दीचा होत आहे, मात्र वाहनतळाच्या नावावर भाविकांकडून येथील पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावरील ट्रस्टतर्फे आर्थिक लूट सुरू आहे.
वनविभागाने यासंदर्भात ट्रस्टला अनधिकृत पार्किंग शुल्क आकारण्यास मनाई केली आहे. असे असले तरी भाविकांची सर्रास लूट सुरू आहे. (Financial looting of devotees started in Pinakeshwar Parking fee levied by Trust despite Forest Department prohibition Nashik)
जातेगाव येथील पिनाकेश्वर महादेव मंदिरात श्रावण महिन्यात संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात. नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी त्यांच्या निधीतून पिनाकेश्वर मंदिरासाठी पाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. यामध्ये प्रामुख्याने पिनाकेश्वर मंदिरात जाण्यासाठी
भाविकांना योग्य रस्ता नसल्याने भाविकांना डोंगर चढताना तारेवरची कसरत करावी लागत होती. श्रावण महिन्यापूर्वीच रस्त्याचे काम युद्धपातळीवर करण्यात येऊन भाविकांना रहदारीसाठी खुला केला.
संबंधित रस्ता हा वनविभागाच्या हद्दीतून गेलेला आहे, असे असतानाही ट्रस्टकडून पिनाकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या वाहनांकडून वाहनतळाच्या नावाखाली अनधिकृतपणे पार्किंग शुल्क घेतले जात आहे.
चारचाकी वाहनांसाठी पन्नास रुपये तर दुचाकींसाठी वीस रुपये आकारण्यात येत आहे. वाहनतळ हे गेल्या वर्षापासून सुरू करण्यात आले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
ट्रस्ट कर्मचाऱ्यांचे उद्दाम वर्तन आणि आर्थिक लुटमारीमुळे अनेक भाविकांना हमरीतुमरीच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र आहे. शुल्क आकारण्यास गावकऱ्यांनी विरोध केल्यानंतर गावकऱ्यांना यातून वगळण्यात आले आहे.
वनविभागकडून कारवाईचे पत्र
वनविभागाने कुठल्याही प्रकारचे वाहन पार्किंग शुल्क आकारण्याची परवानगी दिलेली नाही. तरी देखील राखीव वनातून भाविकांकडून वाहन पार्किंग शुल्क आकारले जात आहे.
विनापरवाना राखीव वनातून पार्किंग शुल्क आकारू नये, अन्यथा आपल्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा आशयाचे पत्र पिनाकेश्वर महादेव मंदिर डोंगरावरील ट्रस्टला पाठविण्यात आल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष ढोले यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.