Special team of railways in action against free train passengers. esakal
नाशिक

Nashik News: फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून सव्वा लाखांचा दंड वसूल; मनमाड, नाशिकरोड स्थानकात कारवाई

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तिकीट न काढताच प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर रेल्वेने कारवाईचा बडगा उगारला असून मनमाड रेल्वेस्थानकात १ लाख २२ हजार ४६० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

प्रवाशी गाड्यांची तपासणी करत अनधिकृत हॉकर्ससह अनधिकृत पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.

मनमाड रेल्वे सुरक्षा दल व नाशिक रोड रेल्वेस्टेशन बल यांच्या पथकाने मनमाडसह नाशिक रोड रेल्वेस्थानकात एक दिवसीय विशेष तपासणी अभियान राबवले. रेल्वेच्या वाणिज्य विभागाच्या नेतृत्वाखाली ही मोहिम राबविण्यात आली.

मनमाड ते नाशिक रोड दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमध्ये विशेष तिकिट तपासणी मोहिम राबवली. यामध्ये रेल्वेच्या ८८ कर्मचारी, अधिकाऱ्यांचे पथक सहभागी झाले. मनमाड स्थानकात ८ प्रवाशी गाड्यांची तपासणी करण्यात आली.

त्यात अनाधिकृत हॉकर्स, चेन पुलिंग करणारे, विनातिकिट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. मनमाड स्थानकावर शिर्डी- हावडा, कर्नाटक, सचखंड, तपोवन, हुबळी, जनशताब्दी, गोरखपूर, पुणे, मंगला, पवन एक्स्प्रेसची तपासणी करण्यात आली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

धावत्या रेल्वेगाडीत आगीच्या घटना काही दिवसात घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आठ प्रवाशी रेल्वे गाड्यांमधील पेंट्रीकार बोगीची कसून तपासणी करण्यात आली. रेल नीर याशिवाय पाण्याच्या अन्य कंपन्यांच्या पाण्याचे ४७ बॉक्स या मोहिमेत जप्त करण्यात आले.

विनातिकीट प्रवास करणाऱ्या १९१ प्रवाशांकडून १ लाख २२ हजार ४६० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

मनमाड एलपीओमध्ये रेल नीर व्यतिरिक्त इतर इतर कंपनीच्या ४७ वॉटर बॉक्स जप्त करण्यात आले. मनमाड स्थानकावर ४ गुन्हे तर नाशिक स्थानकावर १६० गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT