Fire Fighting vehicle esakal
नाशिक

Nashik Fire News : अरुंद रस्त्यावरील आग विझविण्यासाठी वाहने; सिंहस्थ निधीतून प्रस्ताव

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर आग लागण्याची घटना घडल्यास तातडीने घटनास्थळी जलदगतीने विनाअडथळा पोचण्यासाठी अग्निशमन विभागाकडून पाच छोट्या वाहनांचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.

सिंहस्थानंतर गावठाणासह अरुंद गल्लीत पोचण्यासाठीदेखील त्या वाहनांचा वापर होणार आहे.

आग लागण्याची घटना घडल्यास अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी विनाअडथळा पोचण्यासाठी शासनाने नऊ मीटर रुंदीपुढील रस्त्यांवरच बहुमजली इमारत बांधण्यास परवानगी देण्याचे धोरण आखले आहे. (Fire fighting vehicles on narrow roads Proposal from Simhastha fund used in villages Nashik News)

परंतु गावठाण भागात तीन ते चार मीटर रुंदीचे रस्ते, तसेच त्या रस्त्यांवर दुचाकी, रिक्षांसह चारचाकी वाहनांचा गरडा पडल्याने पायी प्रवास करणेदेखील अशक्य आहे. आग लागल्यानंतर मोठ्या प्रमाणात वित्तहानी होते. त्यामागे अरुंद रस्ता व अरुंद रस्त्यातील अडथळे कारणीभूत ठरतात. ज्या ठिकाणी घटना घडते, तेथपासून मोठी वाहने पोचतील.

पुढे छोट्या वाहने आगीच्या ठिकाणी घुसवून त्या वाहनांना मोठ्या वाहनांचा बॅकअप दिला जातो. गावठाणातील अरुंद रस्त्यांमुळे अशा प्रकारची बिकट परिस्थिती निर्माण होते. पंधरा ते वीस वर्षांपूर्वी परिस्थिती वेगळी होती. लोकसंख्या व सर्व प्रकारची वाहने मर्यादित होती. त्यामुळे समस्या जाणवत नव्हती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

परंतु लोकसंख्येबरोबरचं वाढती वाहने ही समस्या अधिक तीव्र होत असल्याने दिवसागणिक गावठाणातील नागरिक धोक्याच्या तीव्र पातळीत आलेला आहे. त्यामुळे आग लागण्याची घटना घडल्यास अरुंद रस्त्यावरून जाण्यासाठी पाच छोटी वाहने खरेदी केली जाणार आहे. सिंहस्थासाठी राज्य शासनाला प्रस्ताव सादर केला जाणार आहे.

त्या प्रस्तावात सिंहस्थासाठी पाच छोटी वाहने खरेदीचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. अग्निशमन विभागाकडील वाहने दर पंधरा वर्षांच्या कालावधीनंतर बदलावी लागतात. सध्या तेरा वाहने कालबाह्य ठरत असल्याने सिंहस्थाच्या निधीतून नवीन वाहने खरेदी केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सहा तर दुसऱ्या टप्प्यात सात नवीन वाहने खरेदी केले जाणार आहे.

गावठाणात हायड्रन्ट

अरुंद रस्ते व दाटीवाटीने उभे असलेले वाडे व घरे असली तरी जलवाहिन्या पोचल्या आहेत. मुख्य जलवाहिनीवरच महत्त्वाच्या ठिकाणी हायड्रन्ट पॉइंट काढण्याचा प्रस्ताव अग्निशमन विभागाने स्मार्टसिटी कंपनीला दिला आहे. जवळपास ४५ हायड्रन्ट पॉइंट काढावे, जेणेकरून अग्निशमन विभागाचे बंब पोचले नाही तरी हायड्रन्टच्या माध्यमातून घटनास्थळी पाण्याचे फवारे मारणे शक्य होणार आहे.

गावठाणातील रस्त्यांची स्थिती

- एकूण रस्ते- १७१

- चार-पाच मीटर रुंदीचे रस्ते- ९०

- उर्वरित रस्ते- ८१.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT