Nashik News : गावाची लोकसंख्या, जनावरांची संख्या आणि शेतीमध्ये निर्माण होणारा कचरा या निकषांच्या आधारे केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानात दुसऱ्या टप्प्यात गोबर्धन योजना राबविण्यात येत आहे.
या योजनेंतर्गत जिल्ह्यातील पहिला प्रकल्प अंदरसुल (ता. येवला) येथे साकारला आहे. गॅस मोजणी मीटर उपलब्ध झाल्यानंतर गॅस वितरण सुरु होणार असून, हा प्रकल्प यशस्वी झाल्यास जिल्ह्यासाठी मॉडेल ठरणार आहे.
विशेष म्हणजे याद्वारे ग्रामस्थांना अल्प दरात घरपोच गस मिळणार आहे. (First Gobardhan project realized in Andarsul Distribution will be done once gas meter available Nashik News)
जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जवळपास ५० लाख रूपये खर्चातून मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प सुरू होत आहे. माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते या प्रकल्पाचे उद्घाटन झाले.
या प्रकल्पातून दिवसाकाठी छत्तीस किलो, तर महिन्याला एक हजार ८० किलो गॅसची निर्मिती होणार आहे. एकूण गोबरधन प्रकल्पात बसविलेल्या फुग्याच्या गॅसची क्षमता ३३ हजार तीनशे किलो इतकी असून, फुग्यांचा आकार चार मीटर लांब, सहा मीटर रुंद व चार मीटर उंच इतका आहे.
गॅस मोजणी मीटर उपलब्ध नसल्याने तूर्त पाच कनेक्शन जोडणीची पूर्वतयारी झाली असुन, एका घराला प्रत्यक्ष गॅस पुरवठा सुरू झालेला असल्याचे ग्रामसेवक बाळासाहेब बोराडे यांनी सांगितले. तर, या महत्त्वपूर्ण प्रकल्पाचा ग्रामस्थांना नक्कीच फायदा असल्याचे सांगून माजी सरपंच सविता जगताप यांनी समाधान व्यक्त केले.
ग्राम पंचायतीलाही उत्पन्न
गोबर्धन योजनेत प्रामुख्याने सर्व प्रकारच्या कचऱ्यापासून निर्माण होणाऱ्या गॅसचा वापर गावातील कुटुंब, शाळा, अंगणवाडी आदी ठिकाणी केला जाणार आहे. गावातील कचरा कमी करून ग्राम स्वच्छतेचा स्तर उंचावण्यासाठी व रासायनिक खतांना पर्याय म्हणून उच्च दर्जाचे खत, बायोगॅस संयंत्रातील उरलेली स्लरी (सेंद्रिय खत) वीस टक्के स्वस्त दराने शेतीसाठी दिले जाणार आहे. यामुळे शेतीचा सुपीकता वाढणार असून, ग्रामपंचायतलाही आर्थिक स्रोत वाढणार आहे.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
योजनेची उद्दिष्ट्ये
* अस्वच्छ कचऱ्याची विल्हेवाट लावून रोगांचे निर्मूलन करणे
* कचरा कमी करून गाव स्वच्छतेचा स्तर उंचावणे
* सेंद्रिय खत, बायोगॅस प्लांटमधील अवशिष्ट स्लरी वापरून रासायनिक खतांना पर्याय म्हणून उच्च दर्जाचे खत प्रदान करणे.
* ग्रामीण भागातील लोकांचे उत्पन्न आणि रोजगार वाढवण्याचा प्रयत्न
"जिल्हा परिषदेने या प्रकल्पासाठी अंदरसुल गावाची निवड केल्यानंतर सर्व सहकाऱ्यांच्या मदतीने आम्ही पाठपुरावा केला. आता प्रत्यक्षात प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून, याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. या प्रकल्पामुळे ग्रामस्थांना स्वस्त दरात गॅस मिळणार आहे. शिवाय जिल्ह्यातदेखील त्याचे अनुकरण होईल, याचा आम्हाला अभिमान आहे."
-सविता जगताप, माजी सरपंच, अंदरसुल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.