नाशिक : जलवाहिन्या, पावसाळी गटार, भूमिगत विद्युत वाहिन्या, इंटरनेट केबल्स, मलवाहिन्या यांची अचूक माहिती डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळण्यासाठी स्मार्टसिटी कंपनीकडून भौगोलिक माहिती प्रणाली अर्थात जीआयएस मॅपिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्या अनुषंगाने गावठाण भागात सर्व्हेक्षण सुरू करण्यात आले आहे.
नागरी- सोयी सुविधा एकाच व्यासपीठावर संचलित करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे कारण दिले जात असले तरी यानिमित्ताने मालमत्तांचेदेखील सर्व्हेक्षण होणार असल्याचे बोलले जात आहे. (First honor for Nashik Gaothan to go digital GIS Mapping of Civic Facilities Nashik latest marathi news)
केंद्र सरकारच्या नगर विकास मंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. शहरांमधल्या पावसाळी गटार योजना, जलवाहिन्या, भूमिगत विद्युत वाहिन्या, इंटरनेट केबल्स, मलवाहिका यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी स्मार्ट शहरांमध्ये हा उपक्रम राबविला जात आहे.
गावठाण भागात सध्या विकासाची कामे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे नाशिकमध्ये अशा प्रकारची माहिती संकलित करण्यासाठी गावठाणाची निवड करण्यात आली. पंचवटी, जुने नाशिक, गंगापूर रोड परिसरात घरोघरी जाऊन सर्व्हेक्षण होणार आहे. ॲपवर माहितीची नोंद होईल, स्मार्टसिटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून सर्व्हेक्षण होईल.
त्यासाठी कर्मचाऱ्यांना ओळखपत्रे दिली जाणार आहे. नाशिक शहराच्या नागरी सेवांच्या रचनाबध्द डिजिटल नोंदी, उपयुक्तता मोजणी व भविष्यातील नागरी सुविधांच्या नियोजनासाठी जीआयएस मॅपिंग करणे गरजेचे आहे. जीआयएस मॅपिंगच्या माध्यमातून मिळणारी माहिती महापालिकेच्या संकेतस्थळ व डिजिटल ॲप्लिकेशनवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून महापालिकेकडून पुरविण्यात आलेल्या सुविधांची अचूक माहिती मिळणार आहे. जीआयएस मॅपिंग हे जगभरातील विविध विकसित शहरात वापरले जात आहेत. या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वर्तमानातील सेवा सुविधांच्या जाळ्याची विस्तृत माहिती उपलब्ध होऊन भविष्यात नियोजन करणे सोपे होणार आहे.
त्याचप्रमाणे नागरिकांना उद्भवणाऱ्या समस्यांचेदेखील निवारण करण्यास मदत होईल. सुविधांच्या देखभाल दुरुस्ती व नूतनीकरणासाठीदेखील या तंत्रज्ञानाचा उपयोग होईल, असा दावा स्मार्टसिटी कंपनीकडून करण्यात आलेला आहे.
नागरिकांकडून अपेक्षित असलेली माहिती
स्मार्टसिटी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून माहिती संकलित केली जाणार आहे. गावठाण भागातील मालमत्तेच्या मूळ मालकाचे नाव, पत्ता, दूरध्वनी क्रमांक, मालमत्तेच्या संदर्भातील कागदपत्रे (घर- पाणीपट्टी, क्षेत्रफळ) नळ जोडणी, गटार, इलेक्ट्रिसिटी जोडणी, पॉवर बॅकअप, पार्किंग, फायर एक्सटेन्शन, लिफ्ट, रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोष खड्डा या संदर्भात माहिती विचारली जाईल.
मालमत्तेचा वर्तमान वापर, व्यावसायिक, खासगी, शासकीय वापर यासंदर्भातील माहिती, तसेच उपरोक्त माहितीची मोबाईल ॲपमध्ये नोंदणी केली जाणार आहे. ज्या घराची माहिती विचारली जाईल, मोबाईल ॲपमध्ये त्याची नोंदणी करून घराचे जिओ टॅगिंग फोटो घेतले जाणार आहे. स्मार्टसिटी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे यांनी केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.