Yevla office bearers inviting Ranganath Pathare for the post of president of the Sahitya Samelan. esakal
नाशिक

Nashik News: येवल्यात नोव्हेंबरमध्ये प्रथमच साहित्य संमेलन; अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारेंची निवड

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : येवल्यात नोव्हेंबरमध्ये प्रथमच होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे भूषविणार आहेत. साहित्य परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रा. पठारे यांना प्रत्यक्ष भेटून निमंत्रण दिले.

त्यांनी त्याचा स्वीकार केला आहे. साहित्य परिषदेचे अध्यक्ष सूर्यकांत सस्कर, कार्याध्यक्ष विक्रम गायकवाड, कोषाध्यक्ष डॉ. भाऊसाहेब गमे, उपाध्यक्ष शरद पाडवी, सहसचिव बाळासाहेब हिरे आणि ज्येष्ठ कवयित्री व शब्दालयच्या प्रकाशिका सुमती लांडे आदी उपस्थित होते. (First Literary Conference in Yevla in November Selection of veteran writer Ranganath Pathare as President Nashik News)

प्रा. रंगनाथ पठारे यांच्या चौदा कादंबऱ्या असून त्यांच्या ‘ताम्रपट’ या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे.

दिवे गेलेले दिवस, रथ, चक्रव्यूह, हारण, टोकदार सावलीचे वर्तमान, ताम्रपट, दुःखाचे श्वापद, नामुष्कीचे स्वगत, त्रिधा, कुंठेचा लोलक, भरचौकातील अरण्यरुदन, एका आरंभाचे प्रास्ताविक, चोषक फलोद्यान आणि अलीकडेच गाजलेले सातपाटील कुलवृत्तांत या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत.

अनुभव विकणे आहे, ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, गाभ्यातील प्रकाश, चित्रमय चतकोर, तीव्रकोमल दुःखाचे प्रकरण, शंखातला माणूस हे कथासंग्रह आहेत. ललित साहित्यात निसटलेली पाने, संचित आणि संघर्ष ही दोन पुस्तके असून त्या शिवाय वैचारिक लेखन, समीक्षा आणि संशोधन असे पाच ग्रंथ आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दोन अनुवादित ग्रंथ तसेच दिलीप चित्रे आणि रंगनाथ पठारे एक संवाद आहे. इतकी मोठी साहित्य संपदा असल्यामुळेच त्यांच्या साहित्यिक ज्ञानाचे मार्गदर्शन व्हावे, लाभ व्हावा यासाठीच त्यांची संमेलनाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येऊन सन्मानाने निमंत्रण देखील देण्यात आले आहे.

या साहित्य संमेलनात प्रा.रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षीय भाषणाबरोबरच प्रदीर्घ प्रकट मुलाखत घेण्यात येणार आहे.

"येवला शहराला मोठी साहित्यिक परंपरा आहे, तिला पुन्हा नवे रूप देत साहित्य परिषदेने येथे मागील तीन-चार वर्षात अनेक उपक्रम राबविले. नाट्य संमेलनही भरविले आहे. नव्या पिढीला हा साहित्यिक वारसा समजावा व ही परंपरा अव्याहतपणे सुरू राहावी यासाठीच येवल्यात साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे."

- विक्रम गायकवाड, कार्याध्यक्ष, साहित्य परिषद, येवला

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Explained: डोनाल्ड ट्रम्प जिंकले तर शेअर बाजार कोसळणार; कमला हॅरिस अध्यक्ष झाल्यास काय होईल?

भाजपची 'ती' ऑफर स्वीकारली असती, तर जयंतराव आणि मी लालदिव्यातून फिरलो असतो; सुप्रिया सुळेंचा मोठा गौप्यस्फोट

हे काय वागणं आहे... Bigg Boss 18 मधील 'या' स्पर्धकावर भडकली रुपाली भोसले; सिद्धार्थ शुक्लासोबत तुलना करत म्हणाली-

Fact Check :'गंभीरकडून काही होणार नाही, मला कमबॅक करावं लागेल'; MS Dhoniचा Video Viral, चाहते सैराट

Latest Marathi News Updates live : अजित पवार गटातील कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरींची शरद पवारांच्या पक्षात घरवापसी

SCROLL FOR NEXT