Mahalaxmi Theater latest marathi news esakal
नाशिक

पंचवटीकरांना मिळणार पहिले Multiplex; महालक्ष्मी चित्रपटगृहाचे रूप पालटणार

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी (जि. नाशिक) : दिंडोरी रोडवरील महालक्ष्मी चित्रपटगृहाला इतर एकपडदा चित्रपटगृहांप्रमाणे प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होत गेला. कोरोनाकाळात चित्रपटगृह बंद करण्यात आले, तेव्हापासून हे चित्रपटगृह बंद होते.

ते पाडण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याच्या जागेवर दोन किंवा तीन मल्टिप्लेक्स, मॉल, शॉपिंग सेंटर उभारण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने पंचवटीत पहिले मल्टिप्लेक्स मिळणार आहे. (first Multiplex in Panchavati Mahalakshmi cinema will change its appearance nashik Latest Marathi News)

१९८९ साली माजीमंत्री मदन बाफना यांच्या हस्ते या चित्रपटगृहाचे उद्‌घाटन झाले होते. ९०० प्रेक्षकांची क्षमता असलेल्या या चित्रपटगृहात डॉल्बी सिस्टिम, डिजिटल सिस्टिम यासारख्या अद्ययावत सुविधा होत्या.

‘परिंदा’ हा पहिला चित्रपट येथे प्रदर्शित झाला होता. १९९४ ला ‘मै खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटाच्या प्रिमिअर शोसाठी अभिनेता अक्षयकुमार व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांची उपस्थिती लाभली होती. या चित्रपटांसह अनेक चित्रपटांना प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत होता.

२०१४ मध्ये पीके हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यानंतर अनेक चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, त्यांना प्रेक्षकांकडून फारसा प्रतिसाद कमी होत गेला. कोरोना काळात सर्वच बंद झाले तेव्हापासून हे चित्रपटगृह पूर्णपणे बंद पडले.

दिंडोरी रोडवर बाजार समिती प्रवेशद्वारासमोरच्या भागातच हे चित्रपटगृह असल्याने शेतकरी, हमाल, मापारी आदी घटकांना मनोरंजनासाठी हे चित्रपटगृह अगदी सोयीचे झाले होते. आजूबाजूच्या झोपडपट्टीच्या भागातील मजूरही येथे मोठ्या प्रमाणात येत असल्याने हे चित्रपटगृह मध्यमवर्गीयांचे असल्याची ओळख झाली होती.

बाजाराचा आणि पगाराच्या दिवशी या प्रेक्षकांची गर्दी होत असल्याने थिएटर हाउसफुल्ल व्हायचे. नंतरच्या काळात मनोरंजनाची इतर साधने उपलब्ध होत गेल्याने एकपडदा चित्रपटगृहाकडे प्रेक्षक वळत नसल्याने इतर चित्रपटगृहांप्रमाणेच हे बंद पडले. कोरोनानंतर बंद अवस्थेत असल्याने ते आता पाडण्यात येत आहे.

या सिनेतारकानी दिल्या होत्या भेटी

या चित्रपटगृहास अनेक दिग्गज दिग्दर्शक, अभिनेते व अभिनेत्री यांनी भेटी दिल्या आहेत. त्यात राजकुमार संतोषी, महेश कोठारे, श्रीदेवी, अक्षयकुमार, शिल्पा शेट्टी, राकेश रोशन, राजेश्वरी यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT