नाशिक ( जि. नाशिक) : राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय केंद्र सरकारने २०२१ मध्ये घेतला. त्यातंर्गत मुलींसाठी देशातील पहिली सरकारी सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था नाशिकमध्ये मंजूर झाली आहे.
या संस्थेत प्रथम सत्र प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. संस्था जून २०२३ पासून सुरू होणार आहे. (First session admission process started in pre service training institute for girls in Nashik News)
महाराष्ट्रातील मुलींचे एनडीए तील प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी ही सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्था सुरू होणार आहे. सैनिक सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेण्यासाठी www.girlspinashik.com या संकेतस्थळावर विद्यार्थिनींनी १२ मार्च २०२३ पर्यंत ऑनलाइन नोंदणी करणे आवश्यक आहे.
९ एप्रिल २०२३ ला लेखी परीक्षा होणार असून पात्र विद्यार्थिनींची मुलाखत घेण्यात येणार आहे. सैनिकी सेवापूर्व प्रशिक्षण संस्थेच्या प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रत्येकी ३० विद्यार्थिनींना प्रवेशासाठी सरकारतर्फे जागा निश्चित करण्यात आल्या आहेत.
हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल
प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींची निवास व्यवस्था सद्यःस्थितीतील त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील माजी सैनिक मुलांचे वसतिगृहात केली जाणार आहे. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर ओंकार कापले यांनी ही माहिती दिली.
प्रवेश पात्रता
० महाराष्ट्राची रहिवासी व अविवाहित असावी
० जन्म २ जुलै २००६ ते ३१ डिसेंबर २००८ दरम्यान झालेला असावा.
० दहावीमध्ये शिक्षण सुरू असणे आवश्यक आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.