Dengue Disease  esakal
नाशिक

Nashik Dengue Disease : डेंगी चाचणीसाठी 600 रुपये दर; रुग्णांची आर्थिक लुट

सकाळ वृत्तसेवा

Nashik Dengue Disease : शहरांमध्ये डेंगी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याअनुषंगाने रक्त चाचण्यादेखील वाढल्या आहेत. मात्र रक्तचाचणी करताना खासगी लॅबकडून दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे.

डेंगी वाढत्या रुग्णांचा फायदा घेऊन आर्थिक लूट होण्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मलेरिया विभागाने डेंगीच्या एलायझा चाचणीसाठी शासन निर्देशानुसार सहाशे रुपये दर निश्चित केले आहे. (Fixed rate of Rs 600 for dengue test is set by nmc nashik news)

शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंगी रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑगस्टच्या पंधरा दिवसात ५६ नवीन रुग्ण आढळून आले. एकूण डेंगी बाधितांची संख्या सव्वा दोनशेच्या वर पोचली आहे. रुग्णांच्या आकडेवारीपेक्षा संशयितांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात आहे. महापालिकेच्या रुग्णालयांव्यतिरिक्त खासगी रुग्णालयांमध्ये संशयित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

रुग्णांवर उपचार करताना रक्ताच्या विविध प्रकारच्या चाचण्या खासगी लॅबमार्फत केल्या जात आहे. त्यातून अनेक प्रकारच्या चाचण्या होत असल्याने रुग्णांची आर्थिक लूटदेखील होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

रुग्णाची खात्री करण्यासाठी एलायझा चाचणी केली जाते. चाचणीसाठी मोठ्या प्रमाणात दर आकारले जात आहे.

त्यामुळे एलायझा चाचणीसाठी शासनाने सहाशे रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत. रुग्णालय तसेच खासगी लॅबकडून यापेक्षा अधिक दर आकारले जात आहेत. चाचणीसाठी ६०० रुपयांपेक्षा अधिक दर आकारू नये, असे निर्देश महापालिकेच्या मलेरिया विभागाकडून देण्यात आले आहेत. अतिरिक्त शुल्क आकारल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करण्याचा इशारा मलेरिया विभागाचे प्रमुख डॉ. राजेंद्र त्र्यंबके यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Usha Vance: अमेरिकन पॉवर झोनमधून कमला यांची एक्झिट, उषा यांची एन्ट्री! भारताशी खास कनेक्शन अन् कोण आहेत? जाणून घ्या

"तो सेटवर खूप..." अक्षय कुमारच्या सहकलाकाराचा खळबळजनक खुलासा ; "त्याच्या दोन-तीन गर्लफ्रेंड्स..."

Latest Marathi News Updates live : राहुल गांधींची थोड्याच वेळात सभा

'सिंघम अगेन'मध्ये झळकतायत एक दोन नाही तर तीन मराठी कलाकार; एकाला तर दीपिकाने ऑनस्क्रीन धुतलाय

IPL Mega Auction 2025 : लिलावात Unsold राहण्याची भीती; पृथ्वी शॉ अन् सर्फराज खान यांनी घेतला मोठा निर्णय, सर्वांना वाटले आश्चर्य

SCROLL FOR NEXT