Ganesh Visarjan water tank esakal
नाशिक

Nashik : शहरात 71 नैसर्गिक, कृत्रिम विसर्जन स्थळांची निश्चिती

विक्रात मते

नाशिक : पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून थेट नदी पात्रात मूर्ती विसर्जित न करण्याचे आवाहन नागरिकांना केले आहे. त्याचाच एक भाग म्हणून शहरात ७१ नैसर्गिक आणि कृत्रिम विसर्जन स्थळांची निश्चिती करण्यात आली आहे. (fixing spots of 71 natural artificial water tanks for ganesh visarjan in city Nashik latest Marathi news)

नागरिकांनी, तसेच सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशमूर्तींचे विसर्जन नदीपात्रात करू नये. महापालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांवर मूर्ती दान कराव्या व निर्माल्य संकलन केंद्रावर निर्माण जमा करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दीड, तीन, पाच व सात दिवसांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी नैसर्गिक विसर्जन स्थळे उपलब्ध असतील. कृत्रिम विसर्जन स्थळे फक्त दहाव्या दिवसाच्या विसर्जनासाठीच उपलब्ध राहणार असल्याचे महापालिकेकडून कळविण्यात आले आहे.

ही आहेत कृत्रिम विसर्जन स्थळे

- पूर्व विभाग- लक्ष्मीनारायण घाट, रामदास स्वामी मठ, नंदिनी गोदावरी संगम.

- नाशिक रोड- दसक घाट, चेहडी गाव दारणा नदी, देवळाली गाव वालदेवी नदी, विहीतगाव वालदेवी नदी, वडनेर गाव वालदेवी नदी.

- पंचवटी- म्हसरूळ सीता सरोवर, नांदूर मानूर, आडगाव पाझर तलाव, तपोवन, रामकुंड परिसर, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, टाळकुटेश्वर सांडवा.

- सिडको- पिंपळगाव खांब वालदेवी घाट.

- पश्चिम विभाग- यशवंतराव महाराज पटांगण, रोकडोबा पटांगण, कपूरथळा पटांगण, गाडगे महाराज धर्मशाळा, टाळकुटेश्वर पटांगण, सिद्धेश्वर मंदिर घारपुरे घाट, हनुमान घाट.

- सातपूर- गंगापूर धबधबा, गंगापूर अमरधाम, सोमेश्वर, चांदशी पूल, मते नर्सरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: “आचारसंहिता संपल्याबरोबर डिसेंबरचे पैसे बहिणीच्या खात्यात जमा होतील”; CM शिंदेंची घोषणा

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Champions Trophy 2025: झुकेगा नहीं साला... म्हणत होते, पण BCCI समोर पाकिस्तानची शरणागती, भारताचे सामने 'या' देशात

Raj Thackeray: मुल्ला मौलवी उद्धव ठाकरेंसाठी फतवे काढताहेत, राज ठाकरेंचा आरोप! पुतण्याच्या बालेकिल्ल्यात काढला फतवा

Aditya Thackeray: सत्तेत आल्यास पहिला निर्णय शेतक-यांच्या कर्जमाफीचा! आदित्य ठाकरेंची मोठी घोषणा

SCROLL FOR NEXT