Bhagwatcharya Vasudev Maharaj Sonwane, Narendra Maharaj, committee chief Sunil Deore etc. during the flag and mandap pooja of the Kirtan festival. esakal
नाशिक

Nashik News: मालेगाव येथे कीर्तन महोत्सवासाठी ध्वजारोहण, मंडप पूजन; कार्यक्रमाची जोरदार तयारी

मालेगाव तालुका कीर्तन महोत्सव समितीतर्फे आजपासून (ता. ३१) कीर्तन महोत्सवाला उत्साहात सुरवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : मालेगाव तालुका कीर्तन महोत्सव समितीतर्फे आजपासून (ता. ३१) कीर्तन महोत्सवाला उत्साहात सुरवात झाली. महोत्सवातील पहिले कीर्तन सौंदाणे येथे हभप डॉ. जयवंत महाराज बोधले (पंढरपूर) यांचे पार पडले.

७ जानेवारीला रात्री आठला येथील कॉलेज मैदानावर संत पूजन होणार आहे. दरम्यान रावळगाव येथे ५ जानेवारीला हभप कान्होबा महाराज (देहुकर) यांचे कीर्तन होणार आहे.

या पाश्‍र्वभूमीवर रविवारी (ता. ३१) भागवताचार्य वासुदेव महाराज सोनवणे यांनी सपत्नीक ध्वजारोहण व मंडप पूजन केले. (Flag Hoisting Mandap Pooja for Kirtan Festival at Malegaon Intense preparation for event Nashik News)

पालकमंत्री दादा भुसे यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील सौंदाणे, झोडगे, दाभाडी, करंजगव्हाण, वडनेर, रावळगाव, वडेल व मालेगाव येथे नामवंत संतांचा कीर्तन सोहळा होत आहे. रावळगाव येथे कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरु आहे.

कीर्तन सोहळा होणाऱ्या ठिकाणी ध्वजारोहण व मंडप पूजन कार्यक्रम उत्साहात झाला. महोत्सव समितीचे प्रमुख सुनील देवरे, वासुदेव महाराज, हभप नरेंद्र महाराज गुरव, जितेंद्र आहिरे आदींनी मनोगत व्यक्त करत महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन केले.

यावेळी रमेश आहिरे, रवी पवार, शरद कासार, सुरेश पवार, संजय धिवरे, विश्वास चव्हाण, तानाजी वडक्ते, जयवंत रौंदळ, शरद सोनवणे, किशोर दुकळे, नंदलाल पवार, अण्णा लाड, राजेश पटेल, दत्तात्रेय वडक्ते, दीपक महाले, माधव निकम, आबा बोरसे, अनिल धिवरे, मनोहर राजनोर, सोमनाथ बनकर, भूषण चोपडे, मनोज वाघ, अमोल आहिरे, नीलेश केदारे, संजय देवरे, राजू आंबेकर आदींसह सरपंच, उपसरपंच, विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, शिवसेना, युवा सेना पदाधिकारी, वारकरी व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

रावळगाव येथे कीर्तन सोहळ्यानिमित्त सर्व धार्मिक स्थळांची श्रमदानातून स्वच्छता केली जाणार आहे. ५ जानेवारीला संपूर्ण गावात ग्राम स्वच्छता अभियान राबविले जाणार आहे.

सकाळी गावातील पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील अडीचशे मुले वारकरी पोशाखात टाळकरी म्हणून असतील. गावातून दिंडी काढली जाईल. दिवसभर आरोग्य शिबिर होणार आहे. दुपारी चार ते पाच या वेळेत हनुमान चालिसा पठण होईल.

सायंकाळी पाच ते सात या वेळेत हरिपाठ तर रात्री आठ ते दहा या वेळेत कीर्तन होईल. गावात उत्साहाचे वातावरण असून सोहळा यशस्वितेसाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली पदाधिकारी, कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

संत भोजनात पुरणपोळीचा स्वाद

महोत्सवात ५ जानेवारीला रावळगाव येथे कीर्तन सोहळा होणार आहे. या दिवशी ओंकारनगर येथील ओम माऊली मिरची मसाले सेंटरचे संचालक मनोहर वाघ यांच्याकडे संत भोजन आहे.

कीर्तनकार, टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य आदींसह जवळपास हजार जणांसाठी पुरणपोळीचा महाप्रसाद असणार आहे. कीर्तन सोहळ्यासाठी येणाऱ्या मान्यवरांना खानदेशी पुरणपोळीचा स्वाद चाखायला मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

Pune Assembly Eletion 2024 : मतदान केंद्रांच्या दोनशे मीटर परिसरात वाहने लावण्यास मनाई

SCROLL FOR NEXT