Pimpalgaon Baswant: In the grape orchard of Sudhakar Mengane here, the damage to grape bunches due to attack by bats and in the second photo, netting on the orchard to prevent bat attacks esakal
नाशिक

Nashik News : द्राक्ष बागांवर वटवाघळांच्या झुंडीचा हल्ला

सकाळ वृत्तसेवा

पिंपळगाव बसवंत : अवकाळी पावसाच्या संकटातून वाचविलेल्या द्राक्ष उत्पादक यांचा बागा आता एका नव्या संकटात सापडल्या आहेत. याठिकाणी हजारोंच्या संख्येने येणाऱ्या वटवाघूळ यांच्याकडून द्राक्षबागेचा फडशा पाडण्यास सुरवात केली आहे. साखर उतरून द्राक्ष परिपक्व होण्याच्या स्थितीतील बागांना वटवाघळांनी लक्ष्य केले आहे.

यामुळे वटवाघळांच्या झुंडीनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची झोपच उडविली आहे. अवघ्या काही तासातच वटवाघूळ यांच्याकडून द्राक्ष पिकांना हानी पोचवली जात आहे. घटवाघळांचा हा उपद्रव रोखण्यासाठी बागेवर जाळी टाकण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढवली आहे. वटवाघूळ यांच्या हल्ल्याने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. (Flock of bats attack vineyards 70 percent of grapes are wasted Farmers lost their sleep nashik news)

निफाड, दिंडोरी तालुक्यातील एक लाख एकराहून अधिक क्षेत्र असलेल्या बागांमधील द्राक्षघड परिपक्व होण्याच्या स्थिती आहे. अतिवृष्टीतपण मोठ्या जिद्दीने यंदा द्राक्ष उत्पादकांना बागा जपल्या आहे. रोंगाशी झुंज देत निर्यातक्षम द्राक्ष हाती येण्याची सुखद चिन्ह आहेत. पण रसाळ, टपोरी द्राक्षांना वटवाघळांची दृष्ट लागली आहे. तालुक्यातील द्राक्ष बागांना वटवाघूळांच्या झुंडीकडून लक्ष केले जात आहे. येथील एका शेतकऱ्याच्या बागेतील सत्तर टक्के द्राक्षघड वटवाघुळ यांनी फस्त केल्याने वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फेरले गेले.

एकरी दहा हजार खर्च

वटवाघळांच्या संकटाला तोंड देण्यासाठी द्राक्ष बागायतदार शेतकऱ्यांना आर्थिक झळ बसत आहे. वटवाघळांपासुन संरक्षण करण्यासाठी बागेवर जाळी टाकावी लागत आहे. एकदा वापरली जाणाऱ्या जाळीला एकरी दहा हजार रुपये खर्च येतोय. त्यामुळे वटवाघळांचा बागेतील शिरकाव रोखला जात आहे. जाळी शिवाय काही ठिकाणी रात्रीच्या वेळी बागेत फटाके फोडले जात आहे तर कुठे हॅलोजन सोडून लख्ख प्रकाश केला जातो आहे.

हेही वाचा : जोखीममुक्त व्यवहारांसाठी रिझर्व बँकेचा 'डिजिटल रुपया'

मदतीची हमी नाहीच

वटवाघळामुळे नुकसानग्रस्त बागेचे तलाठ्या मार्फत पंचनामे झाले. पण या संकटाला कशात मोजायची याचे परिमाण नाही. त्यामुळे पंचनामे करूनही शासन स्तरावरून भरपाई मिळेलच याची खात्री नाही. पुढील हंगामापासून विमा काढताना वटवाघळांकडून होणाऱ्या नुकसानीचा समावेश करण्याची मागणी आता होत आहे.

"वटवाघळांकडून होत असलेल्या नुकसानीने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. माझ्या बागेत दोन दिवसापासून वटवाघळे घिरट्या मारत आहे. त्यावर उपाय म्हणून पाच एकर क्षेत्रावर जाळी पसरविली आहे."

- सुधाकर मेंगाणे, द्राक्ष उत्पादक, पिंपळगाव बसवंत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT