Nashik Rain Update News esakal
नाशिक

वरुणराजाच्या उसंतीने गोदावरीच्या पूरपातळीत घट; 59 कुटुंबांचे स्थलांतर

महेंद्र महाजन

नाशिक : वरुणराजाने मंगळवारी (ता. १२) उसंत घेतल्याने गोदावरीच्या पूरपातळीत (Flood Level) घट झाली आहे. नाशिकमधील रामकुंडाशेजारील दुतोंड्या मारुतीच्या कंबरेपर्यंत पुराची पातळी कमी झाली.

गंगापूर धरणातून दहा हजार ३५ क्यूसेक विसर्ग सुरू असताना होळकर पुलाखालून १२ हजार ६७१ क्यूसेक पाणी वाहत होते. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधारेमुळे नदी-नाल्यांना आलेल्या पुरात त्र्यंबकेश्‍वर, सुरगाणा, दिंडोरी, पेठ, नाशिक तालुक्यातील पाच जण वाहून गेले. त्यात एकाचा मृत्यू झाला. चार जणांचे प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे. (flood level of Godavari decreased 59 Migration of families Nashik Latest rain Marathi News)

गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे सुरक्षितता म्हणून सायखेड्यातील ५०, चांदोरीमधील आठ आणि मालेगावमधील एक अशा एकूण ५९ कुटुंबांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. दरम्यान, कोचरगाव (ता. दिंडोरी) येथील विशाखा बुधा लिलके (वय ६) ही बालिका आळंदी नदीच्या पुरात वाहून गेली.

शेतातील घरी विशाखा आणि तिचे काका चालले असताना काकाही वाहून गेले होते. पण ते पोहत बाहेर आले आहेत. पळशी खुर्द (ता. पेठ) येथील एकजण वाहून गेला. तळेगाव (ता. त्र्यंबकेश्‍वर) येथील पोपट रामदास गांगुर्डे (३७) हा तरुण किकवी नदीत वाहून गेला.

सुरगाणा तालुक्यातील नार नदीवर असलेल्या पुलावरून दुचाकीवरून जात असताना सुरेश आबाजी कडाळी (२५) आणि विजय पांडुरंग वाघमारे (२३, दोघे रा. भिंतघर, ता. सुरगाणा) हे दोघे वाहून गेले आहेत. शिलापूर (ता. नाशिक) येथील कृष्णा गांगुर्डे याचा गोदावरी नदीलगतच्या नाल्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने मृत्यू झाला.

याशिवाय अंबासन येथील आणि पेठ येथील घराची भिंत कोसळली. पेठमध्ये पाच जण जखमी झाले. त्र्यंबकेश्‍वर व मालेगाव तालुक्यात चार जनावरांसह एक वासरू दगावले आहे.

चौदा पूल वाहतुकीसाठी बंद

देवळा तालुक्यातील दोन, पेठ तालुक्यातील सहा, सुरगाणा व निफाड तालुक्यातील प्रत्येकी तीन पुलांसह रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते. दरम्यान, जिल्ह्यातील ९२ घरांची पडझड झाली आहे. त्यातील ९१ घरांची अंशतः, तर एका घराची संपूर्ण पडझड झाली आहे.

पेठ तालुक्यातील १४, दिंडोरीतील ११, सुरगाण्यातील नऊ घरांचे अधिक नुकसान झाले. सुरगाणा तालुक्यातील एका शाळेची संरक्षक भिंत पडली आहे. पाळे (ता. कळवण) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत पडली आहे.

आदिवासी सहा तालुक्यांत अतिवृष्टी

कळवण, सुरगाणा, दिंडोरी, पेठ, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्‍वर या सहा आदिवासी तालुक्यांत गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली आहे. कळवणमध्ये १३९.५, सुरगाण्यात २६९.६, दिंडोरीत १७२, इगतपुरीमध्ये ९०.७, त्र्यंबकेश्‍वरमध्ये १३१.५ मिलिमीटर पावसाची चोवीस तासांत नोंद झाली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १५५.१ टक्के पावसाची नोंद झाली.

मालेगाव, बागलाण, कळवण, सुरगाणा, दिंडोरी, पेठ, चांदवड, देवळा या तालुक्यांतील आतापर्यंतचा पाऊस २०० टक्क्यांच्या पुढे पोचला आहे. इगतपुरी तालुक्यात ६४.४ टक्के पावसाचा अपवाद वगळता इतर तालुक्यात पावसाने शतकी उंबरठा केव्हाच ओलांडला आहे.

जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम २४ धरणांमध्ये आतापर्यंत ६३ टक्के साठा झाला आहे. गेल्या वर्षी याच काळात २७ टक्के साठा उपलब्ध होता. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील साठा ६७ टक्के ठेवण्यात आला आहे.

पावसाच्या पडसादाच्या ठळक नोंदी

० नाशिकमधील काझी गढीवरील तीन घरांच्या भिंती कोसळल्या

० नाशिकमधील शाळा बुधवार (ता. १३)पासून सुरू अन् जिल्ह्यात शाळा सुरू करण्याचा निर्णय स्थानिक स्तरावर

० धुळ्यातील राज्य आपत्ती प्रतिसाद दल पथक नाशिकमध्ये दाखल

० पुराची पातळी कमी झाल्याने नाशिकमधील सराफ बाजारात साफसफाई सुरू

० वनोली ते चौंधाणे रस्त्यावरील हत्ती नदीवरील पूल गेला वाहून

० नामपूर भागातील मोसम नदीला पूर अन् अंबासन भागातील हरणबारी धरण व जाखोड लघु प्रकल्प भरला

० सिन्नरमधील बोरखिंड आणि कोनांबे प्रकल्प ‘ओव्हरफ्लो’

० मुलूखवाडी (ता. देवळा) पाझर तलावाचा धोका कमी करण्यासाठी साठा केलाय कमी.

० दिंडोरीतील ओझरखेड आणि वाघाड धरण ‘ओव्हरफ्लो’

० टाकेदच्या कडवा नदीला दहा वर्षांत पहिल्यांदा पूर आणि पुलावरून पाणी गेल्याने वाहतूक ठप्प

० देवळा तालुक्यात गिरणा नदीच्या पुराने शेतीचे मोठे नुकसान

० इगतपुरी शहरात आंब्याचे झाड वीजखांबावर पडल्याने काही भागात वीजपुरवठा खंडित.

धरणांमधून सुरू असलेला विसर्ग

(आकडे क्यूसेकमध्ये)

० नांदूरमध्यमेश्‍वर- ७७ हजार ४२७

० दारणा- १४ हजार ३४२

० पालखेड- ३० हजार १८८

० करंजवण- १५ हजार ६८०

० पुणेगाव- ३ हजार ९१८

० चणकापूर- २१ हजार २७२

० हरणबारी- ६ हजार २२१

० कडवा- ३ हजार ५१७

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: हितेंद्र ठाकूर आणि स्नेहा दुबेंमध्ये काट्याची टक्कर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: राहुरी विधानसभा मतदारसंघात प्राजक्त तनपुरे ३४९ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Maharashtra Assembly 2024 Result : फडणवीस की पटोले; ठाकरे की शिंदे; काका की पुतण्या? इथे पाहा सर्वांत वेगवान आणि अचूक निकाल LIVE Video

SCROLL FOR NEXT