मालेगाव (जि. नाशिक) : कोरोना नियंत्रणात आल्याने या वर्षी सण- उत्सव जोमाने साजरे होत आहेत. गणेशोत्सवापाठोपाठ नवरात्रोत्सवाची धूम सुरु आहे. दोन दिवसावर आलेल्या दसऱ्याची तयारी जोमाने सुरु आहे. या वर्षी अतिवृष्टीमुळे झेंडुंच्या फुलांचे उत्पन्न घटले आहे. परिणामी, फुलांचे भाव वाढले आहेत. घाऊक बाजारात फुलांचे दर किलोला ७० ते ७५ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.
किरकोळ खरेदीसाठी ग्राहकांना किलोमागे किमान शंभर रुपये मोजावे लागणार आहेत. दर्जेदार फुलांचा भाव सव्वाशे ते दीडशे रुपये किलो दरम्यान राहू शकतो. नवरात्रोत्सवामुळे फुलबाजार तेजीत आहे. (Flower market booming in wake of Dussehra 2022 Marigold will reach hundred Latest Marathi News)
कोरोनामुळे अनेक निर्बंध होते. मंदिरे बंद असल्याने सलग दोन वर्षे फुल व्यवसायाला मोठा फटका बसला. या वर्षी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. नाशिक जिल्ह्यात चांदवड, मनमाड, दिंडोरी, कळवण व नाशिकच्या काही भागात झेंडुंच्या फुलांचे उत्पन्न घेतले जाते. या वर्षी वेळोवेळी पाऊस होत गेला.
पीक दमदार अवस्थेत असतानाच अति पावसाचा फटका बसला. जवळपास महिनाभर सूर्यदर्शन झाले नाही. झाडाची पुरेशी वाढ झाली नाही. त्याचा उत्पादनावर परिणाम झाला. चांदवड पट्ट्यात सलग तीन ते चार दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे फुलांचे नुकसान झाले. एकूणच अति पावसामुळे अनेक ठिकाणी ३० ते ४० टक्के उत्पादन घटले आहे.
फुलांचे उत्पादन घटल्यामुळे भाव वाढले आहेत. गणेशोत्सवापासून फुलांना मागणी आहे. नवरात्रोत्सवात मागणी वाढली आहे. बुधवारी (ता. ५) साजरा होणाऱ्या दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर फुल बाजारातील उलाढाल वाढली आहे. गेल्या वर्षी १२ ते १५ रुपये किलोने मिळणारी फुले या वर्षी घाऊक बाजारात ७० ते ७५ रुपये किलोने विकले जात आहेत.
शेतमळ्यांमध्ये फुल तोडणीचे काम वेगात सुरु आहे. शेतकऱ्यांना बांधावर चांगले पैसे मिळत असले तरी झालेले नुकसान व घटलेले उत्पादन पाहता जेमतेम खर्चच निघणार आहे. अतिवृष्टी झाली नसती तर या वर्षी झेंडुंच्या फुलांचे देखील विक्रमी अपेक्षित होते.
तीन वर्षानंतर प्रथमच तेजी
चांदवड पट्ट्यात बहुसंख्य शेतकरी तीन टप्प्यात झेंडुची लागवड करतात. जूनमध्ये लागवड केलेला झेंडु श्रावण महिना व गणेशोत्सवात विक्रीला येतो. जुलैमध्ये घेतलेले पीक नवरात्रोत्सव, दसरा व दिवाळीत बाजारात येते. सप्टेंबरअखेरीस लागवड केलेला झेंडू नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यानंतर बाजारात येतो. ४५ दिवसात येणाऱ्या पिकाला एकरी ३० ते ४० हजार रुपये खर्च येत आहे. नवरात्रोत्सव व दसऱ्याला असणाऱ्या फुलांचे भाव दिवाळीतही कायम राहण्याची शक्यता आहे. तीन वर्षानंतर प्रथमच फुल बाजारात तेजीचे वातावरण आहे.
"आम्ही बारमाही झेंडूचे पीक घेतो. फुले वेळोवेळी खुडून त्यांचे व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने केल्यास उत्पन्नात वाढ होते. या वर्षी अतिपावसामुळे पिकाची वाढ खुंटली. तसेच, फुलांचे नुकसान झाले. उत्पादन घटल्यामुळे भाव वाढले आहेत. झालेला खर्च व नुकसान पाहता भाव वाढूनही शेतकऱ्यांना फारसा फायदा होणार नाही. उत्पादन घटल्याने दिवाळीदेखील भाव कायम राहू शकतील." - शिवाजी मोरे, फुल उत्पादक, देणेवाडी, ता. चांदवड
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.