While shopping for women on Fridays for Ghatsthapana esakal
नाशिक

Nashik: खरेदीच्‍या उत्‍सवाला योजनांचा तडका..! नवरात्रोत्‍सवापासून दिवाळीपर्यंत बाजारपेठेत संचारणार चैतन्‍य

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : पितृपक्षाच्‍या कालावधीत बाजारपेठेत काहीशी मरगळ आलेली असताना आता व्‍यावसायिकांना ग्राहकांचे वेध लागले आहेत.

नवरात्रोत्‍सवापासून तर दिवाळी व नववर्षापर्यंत खरेदीचा ओघ सुरू राहणार असल्‍याचे दालन, दुकाने ग्राहकांच्‍या स्‍वागतासाठी सज्‍ज झाले आहेत.

खरेदीच्‍या उत्‍सवाला विविध योजनांचा तडका मिळणार असल्‍याचे ग्राहकांचा आनंद द्विगुणित होण्यास मदत होईल. (flurry of shopping festival plans Chaitanya will circulate in market from Navratri festival to Diwali nashik)

यंदा प्रत्‍येक सणाला खरेदीदारांमध्ये अमाप उत्‍साह बघायला मिळत आहे. नुकताच झालेल्‍या गणेशोत्‍सवानिमित्त बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली होती. परंतु पितृपक्षात काही प्रमाणात बाजारपेठ थंडावली होती.

आता सर्वपित्री अमावस्‍येनंतर बाजारात पुन्‍हा चैतन्‍य संचारणार आहे. ग्राहकांचे स्‍वागत करण्यासाठी व्‍यावसायिक, कंपन्‍यांच्‍या दालनांमध्ये आकर्षक सजावट केली आहे.

सरकारीसह खासगी क्षेत्रातून बोनसच्‍या घोषणांना सुरवात झालेली असल्‍याने खरेदीला प्रतिसाद मिळत आहे. यामुळे सर्वच क्षेत्रांमध्ये चांगल्‍या उलाढालीचे संकेत मिळत आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना उपलब्‍ध आहेत. सुवर्णपेढ्यांकडून घडवणूकीवर २५ टक्क्‍यांपर्यंत सूट दिली जाते आहे.

तर ऑटोमोबाईल क्षेत्रात वाहन खरेदीवर कॅश डिस्‍काउंट, एक्स्चेंज बोनस यासारख्या योजनांनी ग्राहकांना आकर्षित केले जाते आहे.

इलेक्‍ट्रॉनिकच्‍या बाजारपेठेत शून्‍य डाउनपेमेंटपासून ते शून्‍य व्‍याजदरावरील कर्जपुरवठा ग्राहकांना उपलब्‍ध असणार आहे. सणासुदीमुळे बांधकाम क्षेत्राच्‍या अपेक्षादेखील उंचावल्‍या असून, सर्वसमावेशक किमतीत सदनिका उपलब्‍ध करून दिल्‍या जात आहेत.

व्‍यावसायिकांकडून ऑनलाइनला टक्‍कर

सध्या विविध ई- कॉमर्स साइट्‌सतर्फे सेल सुरू असून, सवलतीच्‍या दरात वस्‍तूंची विक्री केली जाते आहे. या ऑनलाइन मार्केटला स्‍थानिक व्‍यावसायिक, कंपन्‍यांच्‍या दालनाकडून टक्‍कर दिली जाते आहे.

ऑनलाइन इतक्‍याच कमी दरात वस्‍तू विक्री करताना ग्राहकांचे मन वळविण्याचा प्रयत्‍न केला जात आहे.

"यंदा पितृपक्षातही ग्राहकांकडून प्रतिसाद मिळाला आहे. वाढत्‍या मागणीमुळे सोन्‍याच्‍या दरांमध्ये काही प्रमाणात वाढ होत असली तरी, उत्‍सवकाळात ग्राहकांचा उत्‍साह कायम राहण्याचा अंदाज आहे. नवरात्रोत्‍सवापासून दिवाळीपर्यंत तेजीची स्‍थिती राहील."

- योगेश्‍वर दंडे, संचालक, गोविंद दंडे ॲण्ड सन्‍स.

"नवरात्रोत्‍सवापासून दिवाळीपर्यंत मूहूर्तानुसार वाहन खरेदीसाठी अनेक ग्राहकांनी आगाऊ बुकिंग केलेली आहे. पूर्वनोंदणी केलेल्‍या ग्राहकांना वाहन उपलब्‍ध करून देण्यास प्राधान्‍य असणार आहे. ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी हा उत्‍सव कालावधी सकारात्‍मक ठरणार आहे."

- सोनल चौधरी, संचालक, उज्‍ज्‍वल ग्रुप.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anmol Bishnoi Detained: बाबा सिद्दीकींच्या हत्येचा सूत्रधार अनमोल बिश्नोईला अमेरिकेत अटक

Anil Deshmukh: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर हल्ला; देशमुख गंभीर जखमी

Mohol Assembly Election : अपक्ष उमेदवार क्षीरसागर यांनी दिला महाविकास आघाडीचे राजू खरे यांना पाठिंबा

हुश्श! प्रचार एकदाच संपला! पंतप्रधान मोदींपासून केंद्रीय मंत्र्यांसह ५ राज्यांचे मुख्यमंत्री अन्‌ सर्वच पक्षप्रमुखांनी गाजविले सोलापूरच्या विधानसभेचे मैदान, कोणाकोणाच्या झाल्या सभा?

43 Fours, 24 Sixes! आयुष शिंदेची Harris Shield स्पर्धेत ४१९ धावांची वादळी खेळी, वाचला सर्फराज खानचा विक्रम

SCROLL FOR NEXT