wedding esakal
नाशिक

'मार्च'मध्ये कोरोना वाढण्यामागे लग्नाची गर्दीच कारणीभूत!

विक्रांत मते

नाशिक : जानेवारी महिन्यात नियंत्रणात आलेल्या कोरोना संसर्गाने (corona virus) मार्च महिन्यात उच्चांकी पातळी गाठण्यामागे लग्न समारंभांना होणारी गर्दी (wedding crowd) कारणीभूत ठरली. या पार्श्‍वभूमीवर लग्न समारंभ, दुकाने सुरू करताना महापालिका आयुक्तांनी इशारा दिला आहे. (Follow-covid-rules-wedding-ceremony-Instructions-of-nashik-Commissioner)

आयुक्तांनी दिल्या महत्वाच्या सुचना

शासन निर्णयानुसार लग्नसमारंभ सोमवार ते शुक्रवार या कालावधीत जास्तीत- जास्त ५० व्यक्तींच्या उपस्थित करण्यास परवानगी देण्यात आली आहे. समारंभ करण्यासाठी महापालिकेचे विभागीय अधिकारी, स्थानिक पोलिस स्टेशनकडून कार्यालय, लॉन्स धारकांना परवानगी घेणे आवश्यक आहे. त्यासाठी कमीत-कमी तीन दिवस अगोदर वधू-वर पक्षाने संबंधित महापालिकेच्या विभागीय अधिकाऱ्यांना रीतसर माहिती कळविणे बंधनकारक आहे. परवानगी आदेशाचे प्रथम उल्लंघन झाल्याचे पोलिसांकडून लॉन्स धारकांवर वीस हजार रुपये, वधू-वर पक्षावर प्रत्येकी दहा हजार, असे चाळीस हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास कोविड अधिसूचना रद्द होईपर्यंत सीलबंद कार्यवाही होईल. या पार्श्‍वभूमीवर लग्न समारंभ, दुकाने सुरू करताना शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जा असा इशारा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी दिला.

दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास.....

अत्यावश्यक सेवेतील वैद्यकीय सेवा, मेडिकल दुकाने, दूध, वृत्तपत्रे विक्री, भाजीपाला व फळांचे दुकाने शासन निर्देशांचे पालन करून सायंकाळी ४ पर्यंत आठवडाभर सुरू राहतील. इतर दुकाने व आस्थापना सोमवार ते शुक्रवार या दरम्यान सांयकाळी चारपर्यंत सुरू राहतील. गर्दीचे विकेंद्रीकरण करून शारीरिक अंतराचे पालन करणे, मास्क परिधान करणे, सॅनिटायझरचा वापर करणे अनिवार्य आहे. दुकानदारांकडून प्रथम उल्लंघन झाल्यास पाच हजार रुपये व ग्राहकाला एक हजार रुपये दंड, दुसऱ्यांदा उल्लंघन झाल्यास कोविड अधिसूचना रद्द होईपर्यंत सील बंदची कार्यवाही होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan East Assembly Election 2024 Result Live: कल्याण पूर्वमध्ये उद्धव ठाकरे गटाला धक्का; सुलभा गायकवाड यांचा दणदणीत विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: महाराष्ट्रानं मतदान केलंय की ईव्हीएम नं केलंय; आदित्य ठाकरेंचा सवाल

Arjuni-Morgaon Assembly Election Result 2024: अर्जुनी मोरगाव मतदारसंघात राजकुमार बडोले आघाडीवर

Santosh Bangar Won Kalmanuri Assembly Election 2024 Result : संतोष बांगर विजयी; डॉ. संतोष टारफे यांचा पराभव

Ulhasnagar Assembly Election 2024 Result Live: उल्हासनगरमध्ये पुन्हा भाजपाचीच सत्ता; कुमार आयलानी यांचा विजय, ओमी कलानींना धक्का

SCROLL FOR NEXT