Thiya protest by women employees of Nandgaon Taluka School Nutrition Diet Committee to get overdue subsidy at the entrance of Panchayat Samiti. esakal
नाशिक

Nashik News : नांदगावला आहार मदतनीस कर्मचाऱ्यांचा ठिय्या; 7 महिन्यापासून थकले आहार अनुदान!

सकाळ वृत्तसेवा

बाणगाव बुद्रुक / नांदगाव (जि. नाशिक) : तालुक्यातील शालेय पोषण आहार बनविण्यासाठी लागणारे खाद्यतेल, भाजीपाला व इंधन खर्च अनुदान गेल्या ७ महिन्यापासून थकल्याने शालेय पोषण आहार मदतनीस यांनी नांदगाव पंचायत समितीच्या प्रवेशद्वारावर आंदोलनाचे केले. मागणी मान्य न झाल्यास प्रजासत्ताक दिनापासून आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील या कर्मचाऱ्यांनी दिला.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

नांदगाव तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेत शालेय पोषण आहार मदतनीस म्हणून काम करण्याऱ्या मदतनीस यांना पोषण आहार शिजविण्यासाठी लागणाऱ्या खाद्य तेल, भाजीपाला व इंधन खर्च शाळा सुरू झाल्यापासून ते डिसेंबर अखेर जवळपास सात महिन्यापासून मिळालेला नाही.

यामुळे ग्रामीण भागातील महिलांना किराणा दुकानदार उधारीवर वस्तू देण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे महिलांना नाइलाजाने पोषण आहार बंद करण्याची वेळ येऊ लागली आहे. यामुळे प्रत्येक महिन्याला खाद्यतेल, भाजीपाला व इंधन खर्च अनुदान वेळेवर देण्यात यावा अशी मागणी करत पंचायत समितीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढत ठिय्या आंदोलन केले.

यावेळी आमची मागणी मान्य न झाल्यास २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या समोर आमरण उपोषण आंदोलन करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. निवेदनावर संगीता सोनवणे, आशा काकळीज, सरला मोढे, संगीता गुंजाळ, संगीता मोकळ, शोभा भोसले, वंदना बाहिकर आदींच्या स्वाक्षऱी आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT