MLA Suhas Kande speaking at a press conference at Shivneri rest house in Nandgaon. esakal
नाशिक

Nashik: दुष्काळ जाहीर करायला भाग पाडू; नांदगाव तालुका, गरज पडल्यास सरकारविरोधात जाण्याची तयारी : कांदे

सकाळ वृत्तसेवा

नांदगाव : जिल्ह्यात सर्वाधिक दुष्काळाची तीव्रता असूनही नांदगाव तालुक्याला शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने जाहीर केलेल्या ट्रिगर १ व ट्रिगर २ मधून का वगळले, याबाबत सध्या गैरसमज पसरविले जात आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कृषिमंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे दुष्काळाबाबत पाठपुरावा केला असून, कुठल्याही परिस्थितीत नांदगावचा दुष्काळ जाहीर करायला भाग पाडू, अशी ग्वाही देत आमदार सुहास कांदे यांनी एवढे सर्व करूनही दुष्काळग्रस्तांच्या यादीत नांदगावचा समावेश झाला नाही तर सरकारविरोधात न्यायालयात जाऊन न्याय मागू आणि त्या ठिकाणी देखील न्याय मिळाला नाही तर आपण आपल्या पदाचा राजीनामा देऊ, असा इशारा आमदार सुहास कांदे यांनी बुधवारी (ता. १८) येथील पत्रकार परिषदेत दिला. (Force to declare drought suhas kande statement Nandgaon taluka prepared to go against the government if necessary ​Nashik)

येथील शिवनेरी विश्रामगृहावर तहसीलदार सिद्धार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, तालुका कृषी अधिकारी रवींद्र डमाले यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्रकार परिषदेत आमदार सुहास कांदे यांनी तालुक्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर भाष्य केले.

शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने १२ ऑक्टोबरला उपाययोजनांबाबत ट्रिगर १ व ट्रिगर २ मध्ये राज्यातील ४२ तालुक्यांचा समावेश करण्यात आल्याबाबत परिपत्रक काढले.

त्या परिपत्रकात नांदगावचा समावेश नसल्याने सध्या स्थानिक सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा होत असल्याने आमदार सुहास कांदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

येत्या नजीकच्या दिवसांत ट्रिगर १ व ट्रिगर २ मध्ये नांदगावचा समावेश झालेला दिसेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

दुष्काळाच्या निकषात बसत असूनही मदत पुनर्वसन विभागाने त्याकडे का दुर्लक्ष केले याबाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुन्हा लक्ष वेधणार असून, कुठल्याही परिस्थितीत नांदगावचा समावेश झालेला आपल्याला दिसेल, याची ग्वाही देताना आमदार सुहास कांदे यांनी उगीचच गैरसमज निर्माण करू नये, असे सांगितले.

आठही मंडळांतील पर्जन्यमान, घटलेली उत्पादकता याबाबत अहवाल पाठविण्यात आल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. पहिल्या यादीत समाविष्ट झाला नसल्याने ही बाब खेदाची असून, या बाबतीत मी मुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांच्या सोबत बोललो असून लवकरच भेट घेणार असल्याचे सांगितले.

आपला तालुका दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आला नाही, तर वेळ पडल्यास मी माझा पदाचा राजीनामा देईल आणि मी सत्तेत असलो तरी त्यांचा विरोधात कोर्टात जाईल, असे सांगितले.

गेल्या ऑगस्ट महिन्यात आमदार सुहास कांदे यांनी दुष्काळाची चाहूल लागलेली दिसताच तातडीने आढावा बैठक घेऊन यंत्रणेला कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.

त्यानंतर २८ ऑगस्टला जिल्हा कृषी अधीक्षकांना तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्या वतीने संयुक्त अहवाल पाठविण्यात आला होता. त्यानंतर १७ ऑक्टोबरला पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना तालुक्यातील दुष्कळाचीही तीव्रता लक्षात आणून देण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT