26 women brought to Mumbai for sex trade Four accused arrested mumbai crime  esakal
नाशिक

Nashik Crime News : बळजबरीने कर्जवसुली अन् कर्जदाराच्या पत्नीचाही विनयभंग! सावकाराला अटक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : साडेचार लाखांचे रकमेच्या कर्जावर १० टक्के दराने व्याज आकारणाऱ्या सावकाराने, ते कर्ज वसुलीसाठी कर्जदाराचे अपहरण करून बळजबरीने पैसे घेतले. तसेच, कर्जदार घरी नसताना, घरात घुसून त्याच्या पत्नीचा विनयभंगही केला. याप्रकरणी पंचवटी पोलिसात संशयित खासगी सावकाराविरोधात विनयभंगासह अपहरण व महाराष्ट्र सावकारी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चेतन प्रकाश बोरकर (३२, रा. तांबोळी गल्ली, हिरावाडी, पंचवटी) असे खासगी सावकाराचे नाव असून, त्यास पोलिसांनी अटक केली आहे. (Forcible debt collection and molestation of debtors wife Money Lender arrested Nashik Crime News)

पाथर्डी फाटा परिसरात कर्जवसुलीच्या तगाद्याला कंटाळून तरुण जोडप्यात आत्महत्त्या केल्याची घटना गेल्या रविवारी (ता. १८) घडली आहे. ही घटना ताजी असतानाच, पंचवटीत खासगी सावकाराने कर्ज वसुलीसाठी कर्जदाराच्या पत्नीचाच विनयभंग केल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेच्या फिर्यादीनुसार, पीडित महिलेच्या पतीने संशयित सावकार बोरकर याच्याकडून फेब्रुवारी २०२० मध्ये ४ लाख ५० हजार रुपयांची रक्कम १० टक्के व्याजाने घेतले होते.

हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...

या व्याजासह कर्जाची रक्कम २६ लाख ९८ हजार रुपयांच्या वसुलीसाठी संशयित सावकार तगादा लावत होता. कर्जाचे पैसे न दिल्याने संशयित चेतनने पीडितेच्या पतीस त्याच्या कारमध्ये बळजबरीने बसवून अपहरण करून जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पतीने ऑनलाइन पद्धतीने चेतनला ५० हजार रुपये दिले व त्यानंतर अडीच लाख रुपयेही दिले.

दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी पीडितेचा पती घरी नसताना संशयित चेतन कर्जदाराच्या घरी गेला व पीडित महिलेचा विनयभंग केला. पंचवटी पोलिसांनी संशयित चेतनला मंगळवारी (ता.२०) रात्री उशिरा अटक केली आहे. या गुन्ह्यामुळे शहरात खासगी सावकारी बिनबोभाट सुरू असल्याचे समोर येते आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT