The migration of winter migratory birds in the Gangapur dam area is creating a fascinating sight esakal
नाशिक

Nashik News: गंगापूर धरण परिसरात परदेशी पाहुणे! हिवाळी स्थलांतरित पक्ष्यांची गंगापूर धरण क्षेत्रात मांदियाळी

देशातीलच नव्‍हे, तर जगभरातील पर्यटकांमध्ये नाशिकच्‍या हवामानाची भुरळ पाहायला मिळते, म्‍हणूनच पर्यटनाच्‍या नकाशा‍वर नाशिकचे स्‍थान अढळ आहे

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशातीलच नव्‍हे, तर जगभरातील पर्यटकांमध्ये नाशिकच्‍या हवामानाची भुरळ पाहायला मिळते, म्‍हणूनच पर्यटनाच्‍या नकाशा‍वर नाशिकचे स्‍थान अढळ आहे.

पण, पर्यटकच नव्‍हे तर पशु-पक्ष्यांनाही इथल्‍या आल्हाददायक वातावरणाची ओढ लागल्‍याचे दरवर्षी पाहायला मिळते.

तब्‍बल २८ हजार फूट उंचीपर्यंत भरारी घेत मध्य आशियातून ‘राजहंस’ या पक्ष्यांनी नाशिकच्या गंगापूर धरण क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून मुक्काम ठोकला आहे. इतरही पक्ष्यांची मांदियाळी या क्षेत्रात सध्या पाहायला मिळते आहे.

सध्या येथे आलेल्या परदेशी पाहुण्यांच्या टिपलेल्‍या विविध छटा.

बर्डलाईफ इंटरनॅशनलतर्फे गंगापूर धरण परिसराला ११ वर्षांपूर्वी महत्त्वपूर्ण अधिवासाचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे दरवर्षी परिसरात नेचर कन्‍झर्वेशन सोसायटी ऑफ नाशिक आणि वेगवेगळ्या पक्षी अभ्यासकांच्‍या माध्यमातून पक्षी निरीक्षण केले जाते.

बरेच परदेशी वास्तव्यास असणारे पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करून भारताच्या वेगवेगळ्या भागांत दाखल होत असतात. या प्रवासादरम्यान ते महाराष्ट्र राज्यातही मुक्काम करतात. साधारणतः फेब्रुवारीच्या अखेरीस ते पुढच्या प्रवासाला निघतात.

नाशिकचा गंगापूर धरण क्षेत्र परिसरही या पक्षी अधिवासासाठी समृद्ध ठिकाण ठरते आहे, अशी नोंद यापूर्वी झालेली आहे. नाशिकमध्ये आलेले हे परदेशी पाहुणे निसर्गात वावरताना परिसराची शोधा आणखी वाढवत आहेत.

या पक्ष्यांचा आहे मुक्काम...

राजहंसाप्रमाणेच इतरही अनेक पक्षी सध्या लक्षवेधी ठरत आहेत. यात दगडांमध्ये हरवणारे छोटे प्राटीकोल, हळदी-कुंकू बदक, ब्राह्मणी बदक, नकटा बदक, मुग्धबलाक, नदी सुरय, शेकाट्या, नीळपंख पक्षी, नीलकंठ पक्षी आदी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी सध्या धरण क्षेत्रात हिवाळ्याच्या आनंद घेत आहेत.

"गंगापूर धरण क्षेत्र परिसर अनेक वर्षांच्या अभ्यासानुसार पक्ष्यांसाठी समृद्ध अधिवासाचे ठिकाण बनले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही याला महत्त्व प्राप्त आहे. म्हणूनच या संपूर्ण परिसराच्या सुरक्षेसह त्याच्या स्वच्छतेची सध्या गरज भासते आहे."

- पूजा कोठुळे, फिल्‍ड ऑफिसर, ‘एनसीएसएन’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT