Liquor stocks of foreign countries seized with containers by the team of State Excise Malegaon Division, including the action team. esakal
नाशिक

Nashik Crime News : सौंदाणे शिवारात विदेशी मद्य जप्त; आयशर कंटेनरसह 94 लाखांचा ऐवज ताब्यात

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : सौंदाणे शिवारातील तुळजाई ढाब्यासमोर राज्य उत्पादन शुल्कच्या मालेगाव विभागाने सापळा रचून संशयावरून आयशर कंटेनर तपासणीसाठी ताब्यात घेतला. त्यात गोवा राज्यात निर्मित व गोवा राज्यातच विक्री करीता असलेला परराज्यातील मद्याचा साठा मिळून आला.

पथकाने कंटेनरसह ९४ लाखाचे परराज्यातील मद्य जप्त केले. कमलेश भारमल राम या चालकाला अटक करण्यात आली आहे. सोमवारी (ता. ६) रात्री ही कारवाई करण्यात आली.(Foreign liquor seized in Saundane Shivara worth rupees 94 lakh nashik crime news )

राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त विजय सूर्यवंशी, दक्षता संचालक सुनील चव्हाण, विभागीय उपआयुक्त डॉ. बी. एच. तडवी, नाशिकचे अधीक्षक शशिकांत गर्जे, उपअधीक्षक ए. सी. तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाचे निरीक्षक दशरथ जगताप, दुय्यम निरीक्षक हर्षराज इंगळे, पंढरीनाथ कडभाने, येवला विभागाचे निरीक्षक व्ही. ए. चौरे आदींनी दारुबंदी गुन्ह्यासंदर्भात महामार्गावर विविध ठिकाणी सापळा रचत वाहन तपासणी सुरु केली.

तपासणी दरम्यान तपकिरी रंगाची आयशर कंपनीचा सहाचाकी कन्टेनर (जीजे ३५ टी ३५३८) संशयावरून अडवला. तपासणी केली असता त्यात कंटेनर चालक गोवा राज्यातील मद्यसाठ्याची इतर व्यक्तितर्फे अवैधरीत्या वाहतूक करताना आढळला.

कंटेनर येथील कार्यालयात आणून विदेशी मद्यसाठा व बियरचा साठा मोजणी केला असता विदेशी मद्याचे व बियरचे एकूण ९०० बॉक्स मिळून आले. मद्यसाठा कंटेनरसह ९४ लाख २४ हजार ६०० रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आलेला आहे.

कंटेनरचालक कमलेश राम व पुरवठादार तसेच वाहन मालकाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दशरथ जगताप या प्रकरणी तपास करीत आहेत. अवैध मद्य निर्माती, विक्री, वाहतुकीबाबत काही माहिती असल्यास संबंधितांनी विभागाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३९९९९ अथवा व्हाटस्‌ॲपवर क्रमांक ८४२२००११३३ यावर तक्रार करावी.

माहिती देणाऱ्याचे व पुरवणाऱ्या व्यक्तीचे नाव गुप्त ठेवण्यात येईल असे राज्य उत्पादन शुल्कच्या येथील कार्यालयाने कळविले आहे. या कारवाईत दुय्यम निरीक्षक एस. आर. वाकचौरे, पी. आर. मंडलिक, सहाय्यक दुय्यम निरीक्षक वंदना देवरे, अवधूत पाटील, जवान दीपक गाडे, शाम पानसरे, प्रवीण अस्वले, डिगंबर पालवी, विठ्ठल हाके, अमन तडवी, संतोष मुंडे, मुकेश निंबेकर आदींनी भाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT