नाशिक : इगतपुरीतील पाडळी शिवारातून ७५ लाख रुपयांचे अवैध विदेशी मद्य व ट्रक असा ९० लाख रुपयांचा मुद्देमाल राज्य उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. या कारवाईत ट्रक चालकाला अटक करण्यात आली आहे. सचिन बाळासाहेब भोसले (२९ रा. भोसले वस्ती, पोखरापूरस ता. मोहोळ, जि. सोलापूर) असे संशयित चालकाचे नाव आहे. (Foreign liquor worth 75 lakh seized from Padali area Nashik Crime Latest Marathi News)
भरारी पथकाचे निरीक्षक जयराम जाखेरे यांना गुप्त माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने रविवारी (ता.४) गस्त घालत इगतपुरीतील पाडळी शिवारातील हॉटेल पवनसमोर संशयास्पद वाहनांची तपासणी केली. तेव्हा अशोक लेलंड कंपनीचा बाराचाकी ट्रक (एमएच -४० वाय-४४६७) अडविण्यात आला, त्याची तपासणी केली असता त्यात केवळ गोवा राज्यात विक्रीसाठी असलेले विदेशी मद्य आढळून आले.
कारवाईत रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या १३८० सीलबंद बाटल्या, ऑल सिझन व्हिस्कीच्या ६०० सीलबंद बाटल्या, मॅकडॉवेल नं-१ व्हिस्कीच्या १२०० सीलबंद बाटल्या, रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या ३०४८ सीलबंद बाटल्या, रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या ६००० सीलबंद बाटल्या (आकार वेगळा), ऑल सिझन व्हिस्कीच्या २४०० सीलबंद बाटल्या असे ६९४ बॉक्स मद्य जप्त करण्यात आले. कारवाईत मद्य व बाराचाकी ट्रक असा ८९ लाख ९३ हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप, अंमलबजावणीचे संचालक सुनील चव्हाण, नाशिकचे विभागीय उपायुक्त अर्जुन ओहोळ, जिल्हा अधीक्षक शशिकांत गर्जे व उपअधीक्षक हर्षवर्धन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयराम जाखेरे, दुय्यम निरीक्षक पी. बी. ठाकूर, राहुल राऊळ, रोहित केरीपाळे, एम. आर. तेलंगे, जवान सुनील दिघोळे, विजेंद्र चव्हाण, धनराज पवार, एम. पी. भोये, राहुल पवार, गोकुळ परदेशी, किरण कदम यांचे पथकाने केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.