वडांगळी : खंबाळे (ता. सिन्नर) येथील शिवारात वनक्षेत्रात बिबट्याला पकडताना सिन्नरच्या वन विभागाच्या पथकाला नाकीनऊ आले. त्यांनी बिबट्या रेस्क्यू ऑपरेशन दिवसभर राबविले, पण बिबट्या हाती लागला नाही.
जेसीबीचा बकेटमध्ये बसून बिबट्या मागे वन विभागाचे पथकातील कर्मचारी लागले. मात्र, चवताळलेल्या बिबट्याने एका कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला. दिवसभर बिबट्याच्या मागावर वन विभाग अन् ग्रामस्थ होते. बिबट्याने सर्वांना गुंगारा देऊन शेततळ्यातील शिवारात धूम ठोकली. (forest department campaign failed in Khambale One employee injured in leopard attack Nashik News)
खंबाळेच्या बिरोबा वाडी भागात बबन रुपवते यांच्या शेतात सकाळी साडेआठला बिबट्या दिसला. त्यामुळे ग्रामस्थांनी वनविभागाला बोलविले. सिन्नर वनविभागाच्या पथकाने रेस्क्यू ऑपरेशन करून बिबट्याला पकडण्याचा निर्णय घेतला.
सकाळपासून बिबट्या जीव वाचत पळत होता. त्यामागे ग्रामस्थ पळत होते, असे दिवसभर सुरू होते. त्यानंतर वन विभागाने ड्रोन कॅमेरा आणला. मक्याच्या शेतात ग्रामस्थांनी संरक्षक जाळी उभारली. त्यातून बिबट्याने हुलकावणी दिली.
दुपारी चार ते साडेचारला वन विभागाने जेसीबी बोलविले. जेसीबीमध्ये पुढच्या बाजूला वन कर्मचारी बसले. बिबट्या पळून पळून चवताळला. त्याने थेट जेसीबीमध्ये पुढच्या बाजूला बसलेल्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला चढवला.
डोळ्यासमोर बिबट्याने हल्ला केल्याने बिबट्या पकडण्याच्या मोहिमेची हवा निघून गेली. खंबाळेकर व वन विभागाच्या पथकाने रेक्यू ऑपरेशनचा नाद सोडून दिला. त्यानंतर बिबट्या वनक्षेत्रात पळून गेला. खंबाळेकरांनी वन विभागाला टॅक्टर, जेसीबी दिले.
मात्र, त्यांचा उपयोग झाला नाही. वन विभागाचे कर्मचारी अनिल साळवे, वसुधा कांगणे, मनीषा जाधव यांनी कोणतेही सुरक्षा नसताना जाळी उभारली.
त्यामुळे बिबट्या चवताळला, असे ग्रामस्थांनी सांगितले. सरपंच मीननाथ डावरे, आण्णासाहेब खाडे, सुनील खाडे, चंद्रभान खाडे, बबन रुपवते, विनोद गायकवाड, रंगनाथ गुळवे, संजय खाडे व ग्रामस्थ उपस्थित होते.
"खंबाळेला बिबट्या पकडताना वन कर्मचाऱ्यांनी सुरक्षा बाळगली नाही. जाळी लावून त्याला हात वारे करून पळविले. त्याने चवताळून हल्ला केला. आम्ही सहकार्य केले, पण रात्री खाडे रुपवते वस्तीकडे बिबट्या आला आहे."- अण्णासाहेब खाडे, शेतकरी, खंबाळे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.