Tree-Plantation esakal
नाशिक

नाशिक जिल्ह्यात यंदा ११ लाख रोपांच्या लागवडीचे नियोजन

कुणाल संत

जिल्ह्यात सामाजिक वनीकरण आणि प्रादेशिक वन विभागातर्फे वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. या वर्षी विभागातर्फे जिल्ह्यात अकरा लाख १६ हजार १२८ रोपांच्या लागवडीचे नियोजन आहे.

नाशिक : जिल्ह्यात सामाजिक वनीकरण आणि प्रादेशिक वन विभागातर्फे वृक्षलागवड मोहीम हाती घेण्यात आली आहे. या वर्षी विभागातर्फे जिल्ह्यात अकरा लाख १६ हजार १२८ रोपांच्या लागवडीचे नियोजन आहे. या मोहिमेंतर्गत खासकरून हरित टेकडी आणि रस्त्यालगत लागवडीला प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी विभागाकडून तालुकास्तरावर नियोजन करण्यात आले आहे. (forest department has planned to plant 11 lakh saplings in nashik district)

वृक्षारोपणाची जोरदार तयारी

राज्यात भाजप सरकारच्या काळात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ५० कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेत संपूर्ण राज्यात पाच वर्षांत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्यात आली. मात्र नंतर देशासह राज्यात कोरोनाचे संकट (Corona Virus) आल्याने वन विभागाचा निधी कोरोना उपाययोजनांकडे वळविण्यात आल्याने दीड वर्षापासून वृक्षलागवड मोहिमेस ‘ब्रेक’ लागला होता. या वर्षीदेखील कोरोनाचे संकट असून, निर्बंधही आहे. कोरोनाचे संकट असले तरी आणि शासनाकडून वृक्षलागवडीचे कुठलेही उद्दिष्ट नसताना वन आणि सामाजिक वनीकरण विभागाकडून वृक्षारोपणाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. या लागवडीअंतर्गत जिल्ह्यात ११ लाख १६ हजार १२८ रोपांची लागवड केली जाणार आहे. १० जूनपासून रोपांची लागवड केली जाणार आहे.

एक हजार हेक्टरवर लागवड

सामाजिक वनीकरण आणि नाशिक वनवृत्तामधील एक हजार ३५४ हेक्टर क्षेत्रावर रोपांची लागवड केली जाणार आहे. यात गट लागवडच्या ५४२, रस्ता दुतर्फाच्या ७६० तर हरित टेकडी लागवडच्या ५२ हेक्टर क्षेत्राचा समावेश असून, गट लागवडीअंतर्गत सहा लाख ६२ हजार ३७८, रस्ता दुतर्फाअंतर्गत चार लाख १८ हजार आणि हरित टेकडीअंतर्गत ३५ हजार ७५० रोपांची लागवड केली जाणार आहे. शहरातील गंगापूर येथील वन विभागाच्या रोपवाटिकामधून एक लाख ८२ हजार ९१८, तर सामाजिक वनीकरणच्या नाशिक रोपवाटिकेतून ५६ हजार ५०० पेक्षा रोपे दिली जाणार आहेत.

तालुकानिहाय वृक्षलागवड

तालुका रोपेलागवड संख्या

नाशिक - १ लाख ११ हजार ७१८

निफाड - ७७ हजार ७३२

देवळा - ७५ हजार ५९०

इगतपुरी - १ लाख ४४ हजार २१६

बागलाण - २ लाख १० हजार ४४६

कळवण - १ लाख ४४ हजार २१६

दिंडोरी - १ लाख १२ हजार ४३६

सिन्नर - ७४ हजार ४२८

त्र्यंबकेश्वर - ४२ हजार ९००

येवला - ३४ हजार १००

पेठ - ३० हजार ८००

नांदगाव - २९ हजार ७००

मालेगाव - २४ हजार ४४२

सुरगाणा - २२ हजार ०००

चांदवड - ०६ हजार ११०

(forest department has planned to plant 11 lakh saplings in nashik district)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

Rohit Pawar: रोहित पवारांचा डायहार्ड फॅन! मताधिक्य कमी-जास्त होत असल्यानं हार्टअटॅकनं आणखी एका कार्यकर्त्याचा मृत्यू

Astro Tips : नव्या जोडप्याची बेडरूम कोणत्या दिशेला असावी? दोघांमध्ये कलह होत असतील तर...

SCROLL FOR NEXT