Forest department seized vehicle for illegal transport of Khair wood in Harsul nashik crime news esakal
नाशिक

Nashik Crime News : खैर लाकडाची अवैध वाहतूक; हरसूल येथे वाहन जप्त

खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारे वाहन वन विभागाने कारवाई करून जप्त केले.

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : येथे खैर लाकडाची अवैध वाहतूक करणारे वाहन वन विभागाने कारवाई करून जप्त केले.

उपवनसंरक्षक, पश्चिम भाग पंकज गर्ग यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात मंगळवारी (ता. ६) पहाटे तीनला आपल्या स्टाफसह सापळा रचून आडगाव ते टोकपाडा रस्त्यालगत संशयित आयशर वाहन (एमएच- ०४/ डीएस- ५७००) मुद्देमालासह ताब्यात घेऊन कार्यवाही केली. (Forest department seized vehicle for illegal transport of Khair wood in Harsul nashik crime news)

वाहनास अडविण्याचा प्रयत्न केला असता आयशर वाहनचालकाने कर्मचारी पथकावर वाहन नेण्याच्या प्रयत्नात वाहन रस्त्यालगतच्या चारीत गेले. अंधाराचा फायदा घेत वाहनचालक व इतर संशयित फरारी झाले.

वाहनाची तपासणी केली असता वाहनाची अंदाजे किंमत रुपये तीन लाख इतकी असून, वाहनातील ३६ नग खैर, घ.मी.-०.६०७ रक्कम रुपये सहा हजार ४०० इतक्या रकमेचा माल जप्त केला आहे.

या कारवाईत हरसूल वनपरिक्षेत्रातील वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास सोनवणे, वनपाल अमित साळवे, सुनील टोंगारे, पद्माकर नाईक, वनरक्षक गजानन कळंबे, मनोहर भोये व वाहनचालक संजय भगरे सहभागी झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT