Priest Prateek Shukla, Mahant Santokdas Maharaj Udasi, Shri Mahant Bhakticharandas Maharaj, Shri Mahant Madhavacharya Maharaj along with the participating monks, saints and mahants present on the occasion of Godaarti. esakal
नाशिक

Godavari Parikrama: गोदावरी परिक्रमेला विधिवत सुरवात; वैष्णव संप्रदायातील साधूंचा जथ्था निघाला

सकाळ वृत्तसेवा

पंचवटी : साधू, संत, महंत यांच्या गोदावरी परिक्रमेस रविवारी (ता. ३) त्र्यंबकेश्वर येथून सकाळी विधिवत पूजा करून प्रारंभ झाला. या यात्रेचे सकाळी साडेदहाला पंचवटीतील पंचमुखी हनुमान मंदिरात आगमन होताच रामनामाचा जयघोष व फुलांची उधळण करीत व पारंपरिक ढोलताशांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले.

यानिमित्ताने रामतीर्थावर साधू, महंतांच्या उपस्थितीत गोदापूजन व आरती करण्यात आली. त्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास ही यात्रा पुढे घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिराच्या दिशेने रवाना झाली. (formal start of Godavari Parikrama group of sadhus of Vaishnava sect nashik)

वैष्णव संप्रदायात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने साधू, संत आणि महंत गोदावरी नदी उगम ते संगम परिक्रमेसाठी निघाले आहेत. या परिक्रमेचे आयोजन श्री टिलाद्वारा गाद्याचार्य मंगलपीठाधीश्वर श्री श्री १००८ श्री महंत माधवाचार्य महाराज यांनी केलेले आहे.

भारतभरातून अयोध्या, जगन्नाथपुरी, वृंदावन, चित्रकूट यांसह नाशिकमधील तीनशेहून अधिक साधू, संत व महंत सहभागी झाले आहेत. रविवारी त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचे दर्शन, अभिषेक व पूजन करून पवित्र कुशावर्त तीर्थावर गोदावरी नदीपूजन व संकल्प करण्यात आला.

त्यानंतर ब्रह्मगिरी, गंगाद्वारदर्शन, संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज समाधीदर्शन घेऊन परिक्रमा यात्रेला प्रारंभ झाला. सकाळी आठला गिरणारे येथील बालाजी मंदिरात यात्रेत सहभागी साधूंचे संतपूजन करण्यात आले.

त्यानंतर सकाळी साडेदहाला जुना आडगाव नाका येथील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरात पंचमुखी हनुमान मंदिर भक्त परिवारातर्फे यात्रेचे जोरदार स्वागत करण्यात आले.

त्यानंतर रामतीर्थावर श्री महंत माधवाचार्य, महंत रामकृष्णदास महाराज, महंत प्रजमोहनदास महाराज, महंत सीतारामदास महाराज, महंत भक्तिचरणदास महाराज, महामंडलेश्वर संविदानंद सरस्वती, महंत रामप्रवेशदास महाराज,

महंत हरिओमदास महाराज, महंत जगदीशदास महाराज, महंत काशीदास महाराज, महंत पूर्णचंद्रदास महाराज, महंत महावीरदास महाराज, महंत देवकीनंदनदास महाराज, महंत हरिदास महाराज, महंत सीतारामदास महाराज,

महंत गोपालदास महाराज, महंत पायगुरुदास महाराज, महंत कृपासिंधूदास महाराज यांच्यासह साधू, महंतांच्या उपस्थितीत गोदापूजन व गोदाआरती करण्यात आली.

संतपूजन केल्यानंतर व उपस्थितांना महाप्रसादाचे वाटप करून झाल्यानंतर गोदावरी परिक्रमा यात्रा घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग, छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने मार्गस्थ झाली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election Result : महायुती सत्तास्थापनेजवळ; महाविकास आघाडीचीही कडवी झुंज

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पूर्व विधानसभेत वरुण सरदेसाईंची मुसंडी

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

SCROLL FOR NEXT