Former MLA JP Gavit punished for bank manager beaten up case at surgana  esakal
नाशिक

Nashik Crime: माजी आमदार जे. पी. गावित यांना दंडाची शिक्षा; बँक मॅनेजरला केली होती मारहाण

सुरगाणा येथे बँकेत आंदोलक महिलांसह गेलेले तत्कालिन आमदार जीवा पांडू गावित यांनी बँक मॅनेजरच्या श्रीमुखात लगावली होती.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सुरगाणा येथे बँकेत आंदोलक महिलांसह गेलेले तत्कालिन आमदार जीवा पांडू गावित यांनी बँक मॅनेजरच्या श्रीमुखात लगावली होती.

याप्रकरणी दाखल गुन्ह्यात गावित यांना जिल्हा सत्र न्यायालयाने तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे. (Former MLA JP Gavit punished for bank manager beaten up case at surgana Nashik Crime)

२०१२ मध्ये महिला बचत गटासंदर्भात आंदोलक महिलांसह तत्कालीन आमदार जे.पी. गावित हे बँकेत गेले होते. त्यावेळी बँकेचे मॅनेजराच्या श्रीमुखात त्यांनी मारले होते.

याप्रकरणी सुरगाणा पोलिसात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील प्रकरणाचा खटला जिल्हा व सत्र न्यायालयाच्या न्या. श्रीमती मृदुला भाटिया यांच्यासमोर चालला.

सरकार पक्षातर्फे सरकारी वकील ॲड. सचिन गोरवाडकर यांनी युक्तीवाद करीत १० साक्षीदार तपासले. यात माजी आमदार गावित हे दोषी निष्पन्न झाले. त्यानुसार, न्यायालयाने गावित यांच्यासह तिघांना प्रत्येकी तीन हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2025 Auction नंतरचे सर्व १० संघ; कोणाकडे सर्वात जास्त खेळाडू, तर कोणाकडे किती उरले पैसे; पाहा एका क्लिकवर

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

SCROLL FOR NEXT