Shivaji Chumbhale & Hiraman Khoskar esakal
नाशिक

Shivaji Chumbhale : हे तर राजकीय षडयंत्र, आमदारांनी केलेले आरोप तथ्यहीन; माजी सभापती चूंभळे यांचे खंडन

सकाळ वृत्तसेवा

Shivaji Chumbhale : इगतपुरी मतदार संघाचे आमदार हिरामण खोसकर यांनी तालुका पोलीस ठाणे ठाण्यात केलेल्या तक्रारीचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी खंडन केले आहे.

बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. अन् हे तर पिंगळे गटाने केलेले राजकीय षडयंत्र असल्याचे माजी सभापती शिवाजी चुंभळे यांनी माहिती दिली. (Former Speaker shivaji Chumbhale reply statement on hiraman khoskar allegations nashik political news)

नाशिकमध्ये १४ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा रणसंग्राम सुरू असून, गुरुवारी माघारीची अंतिम मुदत संपल्यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. त्यामुळे शुक्रवारी चिन्ह वाटप व याद्या जाहीर झाल्याने निवडणूक प्रचाराला जोर आला आहे.

त्यामुळे प्रत्येक उमेदवार मतदारसंघ पिंजून काढत आहे. नाशिक कृषी बाजार समितीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिवसेना शिंदे गट असे चित्र असले तरी पिंगळे गट विरुद्ध चुंभळे गट अशी पारंपरिक लढत होणार आहे.

त्यामुळे दोन्ही गटांकडून मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू एकमेकांना खिंडीत पकडण्याची एकही संधी दोघेही सोडत नाहीत. महाविकास आघाडीमुळे इगतपुरी मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांनी शुक्रवार (ता.२२) रोजी नाशिक तालुका पोलिस ठाणे गाठत भाजप-शिवसेना शिंदे गटाच्या शेतकरी विकास पॅनलचे नेते शिवाजी चुंभळे व त्यांचे पुत्र अजिंक्य चूंभळे यांनी मोबाइलवरून धमकी दिल्याबाबत अदखल पात्र गुन्ह्याची नोंद केली.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

त्यावर बोलताना माजी सभापती शिवाजी चुंभळे म्हणाले की, आमदार खोसकर यांनी केलेले आरोपाचे खंडन करीत, तथ्यहीन असल्याचे सांगितले. तसेच माझ्या मुलाने आमदारांना फोन केला होता. जे बोलणं झालं त्याची क्लिप आमच्याकडे असून ती आम्ही पोलीसांना दाखविली व ऐकवली आहे.

इगतपुरी मतदार संघात आमचे देखील नातेगोते आहे. आम्ही देखील आमदारांना निवडणुकी काळी मदत केली आहे. माजी सभापती देविदास पिंगळे यांनी हा खोटा आरोप करावयास आमदार खोसकर यांना सांगितले, असेही चूंभळे म्हणाले. तसेच माझा मुलगा अजिंक्य दोन वेळा फोनवर बोलला त्यांची क्लिप आम्ही ऐकविण्यास तयार आहोत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : विनोद तावडे यांच्या पत्रकार परिषदेला थोडाचवेळात सुरुवात होणार

SCROLL FOR NEXT