Blue color uniform worn by Zilla Parishad school students esakal
नाशिक

Nashik News: ZPच्या शाळेचे विद्यार्थी स्काउटच्या गणवेशात!

संतोष विंचू

येवला : विद्यार्थ्यांचे आकर्षक, सुंदर व देखणे गणवेश खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळेविषयी गोडी वाढवतात. त्याच धर्तीवर आता जिल्हा परिषदेच्या शाळांनीही एक राज्य गणवेश योजना राबविण्याचा निर्णय झाला आहे.

स्काउट व गाइडच्या धर्तीवर हा गणवेश राहणार असून, या समान रंगाचे दोन गणवेश विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत. जिल्ह्यातील सुमारे अडीच लाख विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. (Former students of ZP in Scouts uniform selection of two half lakh students in uniforms of same color Nashik News)

आतापर्यंत शासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थ्यांनाच गणवेश मिळत होता. या वर्षापासून शासनाने सर्वच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश देण्याचा निर्णय घेतला. जिल्हा परिषदेच्या शाळांतील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना दर वर्षी दोन गणवेश दिले जातात.

गणवेशाला रंग व प्रकाराचे बंधन नसल्याने जिल्हा परिषदांच्या एका गावातील शाळांमध्ये एक गणवेश, तर दुसऱ्या शाळेचा दुसरा गणवेश दिसत होता. यंदा शासनाने जिल्हा परिषदांच्या सर्व शाळांसाठी एकाच रंगाचा गणवेश देण्याची घोषणा केली होती.

मात्र, शाळांमधील समित्यांनी गणवेश खरेदी केल्याने एक गणवेश शालेय समितीकडून, तर दुसरा गणवेश राज्य शासनाकडून देण्याचा निर्णय झाला होता. या वर्षापासून राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून एक राज्य, एक गणवेश निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.

समग्र शिक्षा कार्यक्रमांतर्गत, तसेच राज्य शासनाच्या मोफत गणवेश योजनेंतर्गत शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील पहिली ते इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना एक समान एक रंगाच्या दोन गणवेशांचा लाभ प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत देण्यात येणार आहे.

मोफत गणवेश योजनेसंदर्भात शाळा व्यवस्थापन समितीने स्थानिक पातळीवर कुठल्याही प्रकारे कार्यवाही करू नये, अशा सूचना शालेय शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

असा असणार नवा गणवेश

नवा गणवेश स्काउट व गाइड विषयाला अनुरूप आहे. मुलांसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट, तसेच मुलींसाठी आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाचा स्कर्ट किंवा ज्या शाळांमध्ये सलवार- कमीज असेल, तर सलवार गडद निळ्या रंगाची व कमीज आकाशी रंगाची, अशी गणवेशाची रचना असेल.

त्यापैकी एका गणवेशाला विद्यार्थ्याच्या शर्टवर शोल्डर स्ट्रीप व दोन खिसे असणे आवश्यक आहे. या योजनेंतर्गत पात्र सर्व विद्यार्थ्यांना एक रंग, एक दर्जा असलेला गणवेश देण्याच्या दृष्टीने कापड खरेदीसाठी ई-निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे.

शिलाई महिला बचतगटाकडे

गणवेशाच्या शिलाईचे काम स्थानिक महिला बचत गटामार्फत करण्यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने कार्यवाही करण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश मिळण्याच्या अनुषंगाने शासनाने घेतलेल्या निर्णयाप्रमाणे सर्व कार्यवाही महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत करण्यात येणार आहे.

"जिल्हा परिषदेच्या शाळा इंग्रजी माध्यमांची बरोबरी करीत आहेत. हा स्वागतार्ह निर्णय आहे. दोन गणवेशांसाठी सहाशे रुपये शासन देते. यात शासनाने कापड देऊन शिलाईची जबाबदारी शाळांवर दिल्यास गुंता वाढेल. त्यामुळे शासनाने स्वतः कापड खरेदीसह शिलाई करूनच गणवेश शाळांना पुरवावेत."- बाजीराव सोनवणे, जिल्हाध्यक्ष, प्राथमिक शिक्षक संघ, नाशिक

जिल्ह्यातील लाभार्थी शाळांची संख्या

- दिंडोरी : २१२

- त्र्यंबकेश्वर : २४१

- सिन्नर : २०९

- पेठ : १८७

- नाशिक : १०७

- नांदगाव : २१०

- सुरगाणा : ३०६

- चांदवड : १८०

- निफाड : २२४

- मालेगाव : २९०

- कळवण : २०३

- देवळा : ११८

- बागलाण : २९७

- इगतपुरी : २२२

- येवला : २३६

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

Ghatkopar East Assembly Election 2024 Result live : घाटकोपर पूर्व मतदार संघात भाजप आणि शरद पवार गटात दुहेरी लढत

Mira Bhaindar: Assembly Election 2024 Result Live: मिरा-भाईंदर मतदारसंघात सय्यद मुजफ्फर हुसेन विरुद्ध नरेंद्र मेहता

SCROLL FOR NEXT