Four suspects in Pohane child sacrifice for secret money. along with a team of rural police. esakal
नाशिक

Nashik Crime: गुप्तधनासाठी 9 वर्षांच्या चिमुरड्याचा नरबळी प्रकरणी चौघांना अटक; एक पसार

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : गुप्तधनच्या लालसेपोटी पोहाणे (ता. मालेगाव) येथील अवघ्या ९ वर्षीय चिमुकल्याचा गळा चिरून खून करण्यात आला आहे. पोलीस तपासातून सदरचा प्रकार नरबळीचा असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी ग्रामीण पोलीसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या असून एक संशयित अद्यापही पसार आहे. माणुसकीला काळीमा फासणारी सदरची घटना मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या हददीतील पोहाणे येथे घडली आहे.

कृष्णा अनिल सोनवणे (९) असे जीव गमावलेल्या चिमुकल्याचे नाव असून सर्वसामान्य शेतकरी कुटूंबातील होता. (Four arrested in case of human sacrifice of 9 year old boy for secret money spread Nashik Crime)

उमाजी गुलाब मोरे (४२), रोमा बापू मोरे (२५), रमेश लक्ष्मण सोनवणे (२१), गणेश लक्ष्मण सोनवणे (१९, सर्व रा. पोहाणे, मांजरी नाला शिवार, ता. मालेगाव जि. नाशिक) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे असून, लक्ष्मण नवल सोनवणे (४५) हा पसार आहे.

वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोहाणे येथील ९ वर्षांचा कृष्णा सोनवणे हा गेल्या १६ तारखेला शेतात खेळण्यासाठी गेला, तो परत आलाच नाही. त्यामुळे याप्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसात कृष्णाचे वडील अनिल सोनवणे यांच्या तक्रारीनुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरील गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच पाेहाणेच्या पोलीस पाटीलांनी १८ तारखेला मांजरे नाला परिसरातील शेतातून दुर्गंधीयुक्त वास येत असल्याचे पाेलिसांना कळविले.

त्यानुसार पाेलिस व तहसीलदारांसमक्ष उत्खनन केले असता, मातीच्या ढिगार्याखाली पालथे परिस्थितीमध्ये लहान मुलाचा मृतदेह पुरण्यात आला होता. सदरचा मृतदेह कृष्णाचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी धुळे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.

दरम्यान, पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपविभागीय अधिकारी मालेगाव ग्रामीण विभाग पुष्कराज सुर्यवंशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

त्यावेळी पोलिसांच्या हाती काही संशयास्पद वस्तू व श्वान पथकाने दाखविलेल्या मार्गांवरून संशयित गावातीलच असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी तपास करीत चौघा संशयितांना शिताफीने अटक केली.

सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, वडनेर खाकुर्डी पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक मनोज पवार, उपनिरीक्षक अंकुश नवले, सहायक निरीक्षक देवेंद्र शिंदे, उपनिरीक्षक संदीप पाटील, अंमलदार चेतन संवत्सरकर, अंमलदार देवा गोविंद, सुभाष चोपडा, नरेंद्र कोळी, योगेश कोळी, विजय वाघ, नितीन सपकाळे, गौतम बोराळे, संतोष हजारे, कदम, संजय पवार, सुर्यवंशी, हिम्मत चव्हाण, बापू महाजन, निशा साळवे, बाचकर, रणजित सोळंके, गजानन कासार, महेंद्र पवार, किरण दुकळे यांनी केली आहे. अधीक्षक शहाजी उमाप यांनी या पथकाला १५ हजार रुपयांचे रिवॉर्ड दिले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

असा झाला उलगडा

कृष्णा याचे अपहरण १६ तारखेला झाले होते, तर १७ तारखेला सोमवती अमावस्या होती. कृष्णाच्या गळ्यावर चिरल्याच्या खुणा होत्या. त्यावरून सदरचा प्रकार नरबळीचाच असण्याची शक्यता होती.

त्यादृष्टिकोनातून पोलिसांनी तपास सुरू केला असता, कृष्णा शेवटचा संशयित गणेश सोनवणे याच्यासमवेत दिसल्याचे अनेकांनी सांगितले. त्यावरून संशयित गणेशला ताब्यात घेतल्यानंतर खुनाची उकल होत गेली.

गुप्तधनाची लालसा

संशयित रमेश सोनवणे यांच्या अंगात येते, असे तो सांगतो. परिसरात गुप्तधन असून, त्यासाठी नरबळी देण्याचे त्याने सांगितले होते. त्यानुसार मुख्य संशयित लक्ष्‌मण सोनवणे याने नरबळीचा कट रचला.

तर, गणेश याने त्याच्या ओळखीतून कृष्णासमवेत खेळताना त्याला विश्वासात घेऊन त्याचे अपहरण केले आणि त्यानंतर अमावस्येला त्याचा गळा चिरून खून करण्यात आला. अटक करण्यात आलेल्या संशयितांनी खुनाची कबुली दिली आहे. संशयित हे एकमेकांचे नातलग आहेत.

अंनिसची घेणार मदत

"ग्रामीण भागातील आदिवासी समाजात अद्यापही अंधश्रद्धा असल्याचे या घटनेतून समोर आले आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व पोलिस संयुक्तपणे ग्रामीण भागासह आदिवासी भागात जनजागृतीपर प्रबोधनात्मक उपक्रम राबवतील. जेणेकरून अंधश्रद्‌धेला आळा घालता येईल."- शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shiv Sena: शहाजीबापुंच्या विरोधात ठाकरेंची मोठी खेळी, अजित पवारांच्या बड्या नेत्यानं हाती घेतली मशाल! उद्धव ठाकरे, म्हणाले...

IND vs NZ 1st Test : आता आमची सटकली...! Virat Kohli - सर्फराज खान यांची तुफान फटकेबाजी; भारताचा न्यूझीलंडवर पलटवार

पोट धरून हसाल! आईसक्रीम खात IND vs NZ मॅच पाहणाऱ्या फॅनची शास्त्रींनी उडवली खिल्ली ; Funny Video

Latest Maharashtra News Updates : मुंबईतील धार्मिक संस्थांचा पाठिंबा मिळविण्यासाठी भाजपने रणनीति आखली

बैठकीला नाना पटोले उपस्थित असतील तर...; ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये बिनसलं? जागांचा वाद विकोपाला

SCROLL FOR NEXT