Fraud Crime News esakal
नाशिक

SAKAL Exclusive : स्वाहाकार नडला म्हणूनच सहकार बुडला अन् ठेवीदार अडला!

तब्बल चार संस्थांतील गैरप्रकारांमुळे विश्‍वासार्हता वाऱ्यावर

सकाळ वृत्तसेवा

येवला (जि. नाशिक) : सहकारामध्ये नागरिकांनी पतसंस्था व बँकांत पैसे ठेवणे म्हणजे पूर्णतः विश्‍वासाचा विषय. पण, याच विश्‍वासाचा घात झाला की रडायलाही कोणी मिळत नाही, याचा अनुभव येवल्यातील शेकडो ठेवीदार घेत आहेत.

सहकारातील स्वाहाकारामुळे ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये येथील पाच-सहा संस्थांमध्ये अडकल्याने अर्थकारणावर तर परिणाम झालाच; पण येवल्याची बदनामी होते ती वेगळीच.

सोने परिधान करून गिनीज बुकात नोंद होण्याचा अनोखा विक्रम करणारे गोल्डमॅन पंकज पारख जगभरातील माध्यमांत चर्चेचा विषय झाले खरे. पण, याच गोल्डमॅनच्या अटकेमुळे पुन्हा एकदा सहकारातील सावळा गोंधळ ऐरणीवर आला आहे.

फक्त पारखच नव्हे, तर तब्बल चार पतसंस्था एका मागोमाग एक डबघाईस आल्या आणि त्यातील गैरप्रकारही उघडकीस आल्याने ठेवीदारांचे श्रमाचे आणि घामाचे कोट्यवधी रुपये अडकले. (Four credit institutions of cooperative sector failed malpractices exposed leaving crores of rupees of labor depositors stranded nashik news)

ठेवीदार अडकलेलेच

सुरवात झाली ती जळगाव येथील भाईचंद रायसोनी मल्टीस्टेट पतसंस्थेपासून. अधिक व्याजदराच्या अमिषाला येथील शेकडो ग्राहक बळी पडले. त्यानंतर जिल्हा बँक नोटाबंदी व थकलेल्या कर्जामुळे अडचणीत आल्याने हजारो ठेवीदार अडकले.

येथील सर्वाधिक ठेवींचा विक्रम करणाऱ्या (कै) सुभाषचंद्र पारख सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार आणि ठेविदारांच्या अडकलेल्या कोट्यवधींच्या ठेवी हा सगळ्यात मोठा फटका येवलेकरांना बसला आहे.

किंबहुना, सहकार विभागाच्या तक्रारीनुसार २२ कोटींचा हिशोबच लागत नसल्याने पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, नुकतीच पारख यांना अटक झाली आहे. आता संस्थेचे अध्यक्ष योगेश सोनी व व्यवस्थापक अजय जैन यांच्यासह सोन्याच्या शर्टाच्या मागावर पोलीस असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे पुढे काय हाही प्रश्‍न आहेच.

बेकायदा कामकाज

शहरात नावारुपाला आलेल्या श्री गुरुदेव नागरी सहकारी व धनश्री महिला पतसंस्थांचे संचालक मंडळ बरखास्त करून, सहाय्यक निबंधक एकनाथ पाटील यांनी प्रशासक नियुक्ती केली आहे.

या संस्थांनी तरतुदीचे उल्लंघन करणे, पोटनियम बाह्य कामकाज, जबाबदाऱ्या पार पाडण्यास अक्षम्य निष्काळजीपणा, ठेवी परत न देणे, नियमबाह्य कर्जवाटप आदी बेकायदेशीर कामामुळे संचालकांविरोधात गुन्हाही दाखल झाला आहे.

तसेच, संत जनार्दन स्वामी पतसंस्थेत नियमबाह्य कर्जवाटप व सोने तारणाचा गैरव्यवहार झाल्याचा ठपका लेखापरीक्षकांनी ठेवून पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, येथील ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाल्याने काहीसा दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

जनता पतसंस्थेमुळेही खळबळ

या चार-पाच संस्थांच्या गैर कारभाराचा धुरळा बसतो न बसतो तोच येथील अग्रगण्य जनता नागरी सहकारी पतसंस्थेत तब्बल २९ कोटी २ लाख ४६ हजार रुपयांचा गैरवव्यवहार व फसवणूक झाल्याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना अटक झाल्याने पुन्हा खळबळ उडाली आहे.

संस्थापक दौलतराव ठाकरे यांचा पोलीस शोध घेत आहेत. संचालक मंडळांनी संगनमताने जाणून-बुजून खोट्या नोंदी व चुकीची आर्थिक पत्रके तयार करून संस्थेच्या ठेवीदार व सभासदांची फसवणूक केली आहे.

सहकारी संस्थांचे लेखापरीक्षक संजीव शिंदे (नाशिक) यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, सहकार विभागाने अवसायक म्हणून सहाय्यक निबंधक प्रताप पाडवी यांची नेमणूक केली आहे.

सहकारात लोकांचा पैसा व्यवस्थित न सांभाळल्यास काय वेळ येऊ शकते, हे येवलेकर ठेवीदार सध्या अनुभवत आहेत. सततच्या अशा घटनांमुळे ठेवीदारांच्या विश्‍वासाला तडा जात असून, सहकार क्षेत्रातील जाणकारांना ही जळमटे दूर करण्यासाठी पुढे यावे लागणार आहे हे नक्की..!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

SCROLL FOR NEXT