cyber police esakal
नाशिक

Franchise Fraud Case : ‘त्या’ बँकांना नाशिक सायबर पोलिसांकडून नोटिसा

फ्रॅन्चायसी प्रकरणात एकाची साडेसात लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : फ्रॅन्चायसी घेण्यासाठी संशयितांनी एकाला साडेसात लाख रुपयांचा गंडा घातल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर, या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसांनी गोविंदनगर येथील एसबीआय बँक आणि कोलकत्त्याच्या पीएनबी बँकेला कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. (Franchise Fraud Case Notices to banks by Nashik Cyber ​​Police news)

अविनाश नारायण पवार (४८, रा. हृषीराज हॅबिटॅट, वृंदावन लॉन्सजवळ, गंगापूर रोड) यांची फसवणूक करण्यात आली होती. पवार यांची नाशिकमध्ये विनीत एंटरप्रायझेस ही फर्म असून त्यांना आयटीसी कंपनीची डिस्ट्रीब्युटरशीप किंवा फ्रॅन्चायसी घ्यायची होती.

फेसबुकवर एक जाहिरात पाहून त्यांनी help@itc-portal.org.in संकेतस्थळावरुन माहिती घेतली. त्यावेळी विविध मोबाईलवरुन संशयित प्रदीपकुमार, राकेश त्रिपाठी व चार्ल्स अॅन्टोनी यांनी पवार यांना संपर्क करून फ्रॅन्चायसी देण्याचे कबूल केले.

पवार यांना १६६३१००१००००५३७१ आणि ४७५४००१७०००१४३९७ या बँक खात्यांवर ७ लाख २९ हजार रुपये भरण्यास भाग पाडले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर, त्यांनी नाशिक शहर सायबर पोलिसांत धाव घेतली.

पवार यांनी पैसे भरताना बँक स्लीपवर अकाउंट नंबर व आयएफसी कोड टाकला होता. असे असताना, पैसे कोलकता येथील पीएनबी बँक खात्यात क्रेडीट होणे आवश्यक असताना ते बिहारला वळते झाल्याचे समोर आले. तपासादरम्यान संबंधित बँकेतील अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले जाणार असल्याचे वरिष्ठ निरीक्षक सूरज बिजली यांनी सांगितले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

व्यवहाराची माहिती न देणे भोवणार

एनईएफटी वा आयएमपीएस व्यवहारात आयएफएससी कोड वापराबाबत आरबीआयची नियमावली आहे. त्यात ग्राहकाने व्यवहार करताना बँकेच्या स्लिपवर ब्रॅन्च व आयएफएससी कोड चुकीचा नमूद केल्यास होणारा व्यवहार रद्द होतो आणि ग्राहकास त्यांची माहिती देणे बँकेला बंधनकारक आहे.

तरीही गोविंदनगर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाची शाखा आणि कोलकत्त्यातील पंजाब नॅशनल बँकेच्या सारणी येथील बँक व्यवस्थापनाने पवार यांना व्यवहाराची माहिती दिली नाही. त्यामुळे या बँकांना सायबर पोलिसांकडून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: ज्योती गायकवाड आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT