money fraud crime  esakal
नाशिक

Nashik Fraud Crime: बिनव्याजी कर्ज देणाऱ्या बालाजी फायनान्सकडून फसवणूक! संचालकांसह 20 जणांविरोधात गुन्हा दाखल

चिटफंड प्रकरणाचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, शहर-जिल्ह्यातील सुमारे चारशे जणांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : चिटफंड प्रकरणाचा आणखी एक प्रकार उघडकीस आला असून, शहर-जिल्ह्यातील सुमारे चारशे जणांची फसवणूक झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

पाथर्डी फाटा परिसरातील बालाजी फायनान्सशिअल सर्व्हिसेसच्या माध्यमातून गरिबांचे भले करण्यासाठी दोन लाखांपर्यंतचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. या कर्जावर सबसिडीही मिळत असल्याने या आमिषाला भुलून अनेकांची आर्थिक फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी बालाजी फायनान्सशिअल सर्व्हिसेस प्रा.लि. व एस. के. फायनान्सशिअल सर्व्हिसेस ॲण्ड मॅन पॉवर कन्सल्टन्सी ॲण्ड सर्व्हिसेसच्या संचालकांसह प्रतिनिधी, एजंट अशा सुमारे २० जणांविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा इंदिरानगर पोलिसात दाखल केला आहे. (Fraud by Balaji Finance who gives interest free loans case filed against 20 people including director Nashik Crime)

नरेश महेश शेर (रा. दूर्गानगर, त्रिमूर्ती चौक, सिडको) यांच्या फिर्यादीनुसार, या कंपन्यांचे संचालक कृष्णाराव रेड्डी, माधवन्‌ कृष्णन्‌, श्रीनिवासन्‌, लतिका खालकर उर्फ लावण्या पटेल, नवनाथ खालकर, सुगत औटे, विनोद साळवे, शफिक शेक, मोईन अली सय्यद, विनोद जिनवाल उर्फ विकी, जयश्री गांगुर्डे, भाग्यश्री लिलके, तेजस्विनी अंभोरे, लता हिरे, शिलाताई, अलका लोंढे, परशुराम गावित, अशोक निकम, सलिम खान, उत्तम जाधव यांच्याविरोधात आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शेर यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना त्यांच्या काळ्यापिवळ्या टॅक्सीवरील कर्ज फेडायचे होते. बालाजी फायनान्सशिअलकडून बिनव्याजी २ लाखांचे कर्जाची माहिती मिळाली असता ते गेल्या १३ डिसेंबर रोजी पाथर्डी फाटा परिसरातील के. के. प्लाझामध्ये असलेल्या बालाजी फायनान्सच्या कार्यालयात गेले.

त्यावेळी संशयित शफिक शेख, लतिका खालकर, विनोद जिनवाल, मोईन सय्यद यांनी कर्जाची माहिती देत त्यांचा विश्वास संपादन केला. २ लाखांच्या कर्जावर त्यांना १ लाख ४० हजारांचीच परतफेड करावी लागणार होती.

त्यासाठी त्यांना ३ हजार ८९० रुपयांचा मासिक हप्ता द्यावयाचा होता. त्यासाठी त्यांच्याकडून विविध प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली ९ हजार ६६० रुपये दिले. दोन दिवसांनंतर कर्ज मंजूर न झाल्याने विचारणा केली असता, त्यांना सीबीएस चौकातील एका महिला वकीलाकडे पाठवून शंभर रुपयांच्या मुद्रांकावर सह्या, अंगठ्याचे ठसे घेतले.

त्यानंतरही त्यांना जामीनदार आणण्यास सांगितले. असे या ना त्या कारणांनी त्यांनी कर्जाचा धनादेश घेण्यासाठी चकरा मारल्या.

मात्र, गेल्या ३० डिसेंबर रोजी ते गेले असता, त्यावेळी त्याठिकाणी सुरेखा ज्ञानेश्वर रोकडे (रा. हिरावाडी, पंचवटी), कांता संजय आढाव (रा. रविवार कारंजा), सुनील पगार (रा. ओझर), रोहिदास मोरे (रा. चिंचोळागाव), आश्पाक कादरी यासह अनेक जण त्याठिकाणी कर्जाचे धनादेश घेण्यासाठी आलेले होते.

त्यावेळी संशयितांनी अनेकांची कर्जाच्या नावाखाली फसवणूक केल्याचे समोर आले. त्याबाबत विचारणा केली असता संबंधितांनी धमकावणे सुरू केले.

तसेच, उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यांची १२ हजार ९६० रुपयांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शेर यांनी पोलिसांत तक्रार केली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यता आला आहे.

अशी आहे मोडस्‌

बालाजी फायनान्स कार्यालयात आलेल्या व्यक्तीला बालाजी फायनान्स ही गरिबांसाठीची बिनव्याजी कर्ज देणारी कंपनी असल्याचे भासविले जाते. तसेच २ लाखांच्या बिनव्याजी कर्जावर ६० हजारांची सबसिडी मिळत असल्याचे आमिष दाखवून समोरील व्यक्तीचा विश्वास संपादन केला जातो.

त्यानंतर संबंधिताचे आधारकार्ड, पॅनकार्ड, फोटो, शंभरांच्या मुद्रांकावर करारनामा केला जातो. या प्रक्रियेसाठी विविधप्रकारे पैसे उकळले जातात. त्यानंतर दोन दिवसात धनादेश मिळेल असे सांगत या ना त्या कारणांने संबंधिताला चकरा मारण्यास भाग पाडले जाते.

अशारितीने १२ ते १५ हजार रुपयांपर्यंतची फसवणूक केली जाते. त्यानुसार शहर-जिल्ह्यातील शेकडो जणांची फसवणूक झाल्याचा अंदाज व्यक्त होतो आहे.

यांना केली अटक

याप्रकरणी आर्थिक गुन्हेशाखेने लतिका खालकर, नवनाथ खालकर, सुगत औटे, विनोद जिनवाल उर्फ विकी, उत्तम जाधव, मोईज अली यांना अटक केली आहे.

जिल्हा न्यायालयात हजर केले असता, त्यांना येत्या शुक्रवारपर्यंत ( ता. ५) पोलीस कोठडी सुनावली आहे. गुन्ह्याचा तपास पोलीस आयुक्त संदीक कर्णिक, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय पिसे हे करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Group: PM मोदींचा एक निर्णय अन् टाटांचा शेअर घेण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड; 73 टक्के स्वस्त मिळतोय शेअर

Marathi Language Controversy: मुंबईत रेल्वे कर्मचाऱ्याचा मुजोरपणा! प्रवाशाला हिंदीत बोलण्याची जबरदस्ती, व्हिडिओ व्हायरल

Air Pollution : नाशिकचा वायू गुणवत्ता निर्देशांकात वाढ; वायू प्रदूषित शहरांच्या यादीत 113 स्थानावर

IPL 2025 Auction: विदर्भाच्या पाच खेळाडूचं नशीब फळफळलं, मिळाली मोठी किंमत; पण उमेश यादव 'अनसोल्ड'

Winter Care : हिवाळ्यात मुले सतत सर्दी, आणि खोकल्यानी आजारी पडतात का? तर या ४ हेल्दी पदार्थ बनवून खाऊ घाला.

SCROLL FOR NEXT