crime esakal
नाशिक

Nashik Fraud Crime : ATM मध्ये चिकट वस्तू लावून 33 हजार 500 रुपयांची फसवणूक...

एटीएम मधून बँकेचे ग्राहकांची 33 हजार पाचशे रुपयाची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

सकाळ वृत्तसेवा

विकास गिते : सकाळ वृत्तसेवा

सिन्नर : शहरातील देवी रोड परिसरात असलेल्या आयडीबीआय बँकेच्या एटीएम मधून बँकेचे ग्राहकांची 33 हजार पाचशे रुपयाची फसवणूक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे.

याबाबत पोलिसांनी अनोळखी दोन ते तीन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. (Fraud of Rs 33 thousand 500 by placing sticky items in ATM nashik crime news)

ग्राहकांनी याबाबत पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. पैसे मिळाले नाही, परंतु, बँकेच्या खात्यातून वजा झाले. याची सखोल चौकशी ग्राहकांनी केल्यानंतर ही बाब उघडकीस आली. पाच हजार, दोन हजार, तीन हजार, सहा हजार, १० हजार, चार हजार, ५०० असे सात ट्रांजेक्शनच्यावेळी पैसे बाहेर आले नाहीत. ग्राहक निघून गेल्यानंतन संशयितांनी पैसे बाहेर पडण्याच्य ठिकाणी लावलेल्या वस्तूला चिटकलेल्या नोटा मिळवल्या.

२४ जानेवारी रोजी बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांची फसवणूक झाली असून एटीएम मध्ये असलेल्या पैसे बाहेर येत असलेल्या मशीनमध्ये काहीतरी चिकट वस्तू लावण्यात आली होती. पैसे काढताना पैसे बाहेर येण्याऐवजी त्यास चिटकून राहिले. मात्र, एटीएममध्ये पैसे नसतील असे वाटल्याने पैसे काढणाऱ्यांना याबाबत काही साशंकता व्यक्त केली नाही.

मात्र, बँक खात्यातून रक्कम वजा झाल्याने संशय वाढला. याची चौकशी केल्यानंतर एटीएममधील सीसीटीव्हीत अनोळखी तीन इसमांची संशयास्पद हालचाल दिसून आली. त्यातून पैसे बाहेर पडण्याच्या ठिकाणी काहीतरी चिकट वस्तू लावली गेल्याचे समोर आले.

त्यानंतर चेतन देशमुख (४२) यांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिस उपनिरीक्षक सचिन लहामगे घटनेचा तपास करत आहे. अतिशय नवीन फंडा वापरून मोठा स्कॅम करण्याचा प्रकार हा दिसत आहे. एटीएम मधून पैसे काढण्याची आता सुलभ नसल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT