Money Crime esakal
नाशिक

Nashik Crime: आरक्षण काढण्याच्या बहाण्याने गंडविले! वृध्देला 11 लाखांना गंडा

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : येथील महिलेच्या मालेगाव महापालिका हद्दीतील शेतजमिनीवर असलेले आरक्षण मंत्रालयातील ओळखीतून काढून देण्याचे आमिष दाखवून संशयिताचे ७२ वर्षीय वृद्धेची अकरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. (Mistake on pretext of removing reservation 11 lakhs for old age Nashik Crime)

सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कुसुम जिभाऊ बच्छाव (७२, रा. रामवाडी) यांच्या फिर्यादीनुसार संशयित युवराज भीमराव पाटील (५५, रा. आष्टी, जि. बीड) याने २२ ऑक्टोबर २०२१ ते १३ सप्टेंबर २०२३ दरम्यान गंडा घातला.

कुसुम यांची मालेगाव कॅम्प येथे शेतजमीन असून त्यावर मालेगाव महापालिकेने आरक्षण टाकले आहे. संशयित युवराज याने आपली मंत्रालयात व मंत्र्यांसोबत ओळख आहे असे सांगत आरक्षण काढण्याचे आश्वासन दिले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यानुसार कुसुम यांच्याकडे वेगवेगळी कारणे देत पैसे मागितले. कुसुम यांनी ऑनलाइन व रोख पद्धतीने ११ लाख रुपये युवराज पाटील यास दिले.

मात्र युवराज पाटीलने कुसुम यांचे काम केले नाही किंवा पैसेही परत केले नाहीत. त्यामुळे कुसुम यांनी सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT