नांदगाव (जि. नाशिक) : शासनाच्या आदेशाचा दुरुपयोग करून बनावट आदेश सादर करीत फेरफार केल्या प्रकरणी मल्हारवाडी येथील सुखदेव खैरनार यांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान खैरनार यांना न्यायालयाने चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. मालेगावच्या प्रांतांच्या नावाने एकच आदेश दोन व्यक्तीच्या नावेे कसा..? यावरून मोठी खळबळ उडाली आहे. (fraudster Arrested for submitting fake government order)
याबाबत नांदगावचे मंडळ अधिकारी भिका नरोटे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. जीवन शंकर खैरणार रा. मल्हारवाडी, यांच्या तक्रारी अर्जाच्या चौकशीच्या अनुषंगाने पोलिसांनी नांदगावच्या मंडळ अधिकाऱ्याकडे या विषयाशी संबंधित कागदपत्रे मागविली होती. त्यात मंडळ अधिकारी नरोटे याना दस्तऐवजांच्या चौकशी दरम्यान त्रुटी आढळून आल्यात त्यांनी सदर बाब तहसीलदार डॉक्टर सिद्दार्थ मोरे यांच्या निदर्शनास आणून दिल्यात त्यानंतर मंडळ अधिकारी नरोटे यांनी सुखदेव खैरनार यांच्या विरोधात 16 नोव्हेंबरला नांदगाव पोलिसात तक्रार दखल केली.
सुकदेव खैरनार यांनी मौजे गंगाधरी ता. नांदगांव येथील नवीन गट नंबर- 5 व तसेच जुना स.नं. 553/31/31 येथील 150 फुट लांब व 100 फुट रुंदी अशा क्षेत्रावरच्या सातबारा उताऱ्यावर आपले नाव लागावे म्हणून 26 जून 2020 ला अर्ज दाखल केला होता. त्यासाठी जोडलेल्या कागदपत्रात मालेगावचे प्रातांधिकारी यांच्याकडील 31 जानेवारी 1985 च्या मूळ आदेश व मूळ पावती यात फेरफार करून स्वतःचे नाव जोडलेले आढळून आले. वस्तुतः असा मूळ आदेश हा बाणगाव येथील प्रकाश लोढा यांच्या नावाने होता. लोढा यांनी दुध व्यवसायासाठी जागेची मागणी केली होती. मात्र लोढा यांना देण्यात आलेल्या मूळ आदेशासारखाच व त्याच तारखेचा साधर्म्यता असणारा अजून एक आदेश सुकदेव खैरनार यांनी सातबारा उताऱ्याच्या मागणीसाठी सादर केलेला होता. त्यामुळे एकूणच प्रकरणातील गांभीर्य वाढलेले होते.
लोढा यांच्यामूळ आदेशासारखाच आदेश सुकदेव खैरनार यांनी त्यांच्या नावाने जोडताना आदेश व पावती यात फेरफार केल्याचे दिसून आले याबाबत मंडळ अधिकारी नरोटे यांनी याबाबत खैरनार यांच्याकडे विचारणाही केली, मात्र त्यांनी समाधानकारक खुलासा केला नसल्याचे नरोटे यांनी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिले. खैरनार यांच्याकडील आदेशांत फेरफार झाल्याची तक्रार दाखल झाल्याने मंडळ अधिकारी भिका नरोटे यांनी 16 नोव्हेंबर 2021 ला पोलिसात लेखी फिर्याद दाखल केली होती. दरम्यानच्या काळात सुखदेव खैरनार यांनी अटकपूर्व जामिनासाठी प्रयत्न केले, मात्र तो मिळाला नसल्याने खैरनार सकाळी स्वतःहून पोलिसात दाखल झाले अटक झालेल्या खैरनार याना न्यायालयासमोर हजर केले असता दोघं बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने त्यांना चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.