friend committed murder over an old quarrel Nashik Crime News esakal
नाशिक

Nashik Crime News: जुन्या भांडणाची कुरापत काढत मित्रानेच केला खून

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News: घोटीत रामराव नगर येथे सहकाऱ्यांनीच सोमवारी ( ता. १३ ) ( रात्री साडे अकरा वाजेदरम्यान ) युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला आहे. याबाबत घोटी पोलीस ठाण्यात दोघा सख्ख्या भावांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. (friend committed murder over an old quarrel Nashik Crime News)

शहरातील रामराव नगर येथील युवक प्रमोद ( पम्या ) गंगाराम शिंदे ( वय ३६ ) याचा जुना कोल्हार रोड रामराव नगर येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर रात्री दरम्यान कृष्णा विनायक बोराडे, वैभव विनायक बोराडे यांनी मागील भांडणाची कुरापत काढून प्रमोद याच्या डोक्यात दगड घालून ठार केल्याची घटना घडली. या घटनेने रामराव नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

यापूर्वी सदर युवक हा गुन्हेगारी कारवाईत सहभागी असल्याने त्यावर घोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या दुष्टीने आपआपासातच असलेल्या किंवा गुन्हेगारी स्वरूपाच्या इसमांनी कट शिजवला का याबाबतीत पोलीस कसून तपास करत असतांनाच पोलिसांना सुगावा लागला व वैभव बोराडे, कृष्णा बोराडे यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघेही घटनेनंतर फरार झाले आहेत.

रात्री साडे दहा ते अकरा वाजे दरम्यान मुंबई -नाशिक मार्गांवरील वर्षा काळे यांच्या हॉटेलवर संशयित आरोपी सोबतच मद्य सेवन केल्याचे पुरावे पोलिसांनी जमा केले आहे. विशेष म्हणजे खून झालेला युवक व खुनी हे आपसात मित्र होते, यापूर्वी खून केल्याल्या युवकाला इगतपुरी पोलिसांनी तीन पिस्तूल सह अटक केली होती. शिष्यानेच गुरूंचा खून केला असा मॅसेज समाजात पसरला आहे.

घटनेनंतर विभागीय पोलीस अधिकारी सुनील भामरे, स्थानिक गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी भेट दिली. व घटनेचा आढाव घेतला. यांसह घटनास्थळी भेट दिली.
घोटी पोलिसांनी आरोपीच्या शोधार्थ दोन पथके रवाना केली असून या गुन्ह्यात अनेक संशयितांची चौकशी घोटी पोलिसांनी केली.

या पथकात सहायक पोलीस निरीक्षक संदेश पवार,उपनिरीक्षक सुदर्शन आवरी, हवालदार विक्रम झाल्टे, मारुती बोराडे, शिवाजी शिंदे सहभागी आहे.

"घोटी धार्मिक, पर्यटन व व्यापारी नागरी आहे. झालेली घटना भयंकर असून अधिक माहिती कोणाकडे असल्यास थेट माझ्याशी संपर्क करावा." - विनोद पाटील, पोलीस निरीक्षक घोटी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT