Friendship Day 2023 esakal
नाशिक

Friendship Day 2023 : ही दोस्ती तुटायची नाय...! सोशल मीडियाने जवळ आले दुरावलेले जिगरी यार...

सकाळ वृत्तसेवा

Friendship Day 2023 : ही दोस्ती तुटायची नाय.. ये दोस्ती हम नही छोडेंगे तोडेंगे दम अगर तेरा साथ ना छोडेंगे... मैत्री ही प्रत्येकाची जीवाभावाची एक ओळख असते. जुन्या काळी रक्ताच्या नात्या पेक्षाही मैत्रीचे नाते हे खूप श्रेष्ठ आहे असे अनेक जण सांगतात.

प्रत्येक मैत्रीचा धागा इतका घट्ट असतो की दुरावलेला सच्चा मित्रही पुन्हा गवसतो, असेच सध्या घडतेय. (Friendship Day 2023 with help of social media old friends are reuniting nashik news)

दुरावलेल्या मित्रांना पुन्हा शोधण्याचे माध्यम सोशल मीडिया बनले आहे. सोशल मीडियाद्वारे कित्येकांना त्यांचे जुने मित्र पुन्हा सापडले आहेत. सध्या तरुण असो किंवा ज्येष्ठ नागरिक अनेकांचे दुरावलेले मित्र फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सॲपद्वारे सापडत आहेत.

जुन्या मित्रांचे ग्रुपही पुन्हा संपर्कात आले असून, चक्क काहींनी तर व्हॉट्सॲपवर बॅच 1980,95, आमचा ग्रुप लय भारी, आम्ही दोस्त, दोस्ताना... असे भन्नाट ग्रुपही तयार केले आहेत. तर काहींचा रोज व्हिडिओ कॉलद्वारे मैत्रीचा कट्टा जमत आहे. सोशल मीडियाने तरुणांचा आणि ज्येष्ठांचा जुन्या मित्रांशी मैत्रीचा बंध नव्याने जुळवून आणला आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

माझा तो जुना मित्र आज काय करत असेल? कुठे असेल आणि कसा असेल? असा विचार प्रत्येकाच्याच मनात असतो. दुरावलेला मित्र पुन्हा भेटावा ही प्रत्येकाचीच इच्छा असते. त्यामुळे अनेकांना सोशल मीडियामुळे दुरावलेल्या मित्रांना परत भेटण्याची संधी मिळत आहे.

अनेकांना ३५ वर्षांपूर्वीची बालमैत्रीण भेटली आहे, तर काही तरुणांना त्यांचा महाविद्यालयीन मित्र पुन्हा सापडला आहे. अगदी शाळेत आणि महाविद्यालयात असलेले बॅचमेट्सही एकमेकांच्या संपर्कात आले असून, व्हॉट्सअॅप चॅट, व्हिडिओ कॉल, झूम मीटिंग अशा विविध माध्यमांतून राहणाऱ्या मित्रांनी एकमेकांशी आपुलकीचे नाते पुन्हा जोडले आहे.

पार्टीसाठी, फिरायला अनेकजण जुन्या मित्रांसोबत आनंदाने मैत्री एन्जॉय करत आहेत (दि. ६) साजऱ्या होणाऱ्या मैत्रीदिनानिमित्त याबद्दल जाणून घेतले.

"आम्ही एकाच शाळेत अनेक वर्षांपासून होतो. दहावीनंतर माझे काही मित्र बाहेर शिकण्यासाठी गेले. त्यानंतर अनेकांचा संपर्क झालं नाही. पण व्हाट्सअप द्वारे देश विदेशात असलेल्या माझा जवळचा मित्र निलेश कणसे यांच्याशी माझा संपर्क झाल्यावर खूप आनंद झाला. त्यानेही मला व्हाट्सअप द्वारे कॉल करून खुशाली विचारली. आज एका व्हॉट्सॲपकॉल मुळे आम्ही सर्व मित्र एकत्र आलो आहोत" -अजित रायते

"लहानपण देगा देवा' अशी म्हणायची वेळ आता आली आहे. ते दिवस कधीही विसरू न शकणारे आहे. आम्ही ते सवंगडी आज अनेक वर्षांपासून व्यवसाय निमित्त व नोकरीनिमित्त बाहेरगावी आहे. मध्यंतरी दोन-तीन मित्रांनी एकत्र येत शाळेचा ग्रुप तयार केला व बघता बघता संपूर्ण शाळा मोबाईलच्या व्हॉट्सॲपद्वारे सर्वांना भेटली. गेट-टुगेदर करून आज आम्ही प्रत्येकाची खुशाली विचारली खूप आनंद झाला. " -मनोज कृष्णाजी भगत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीला सुरुवात; हडपसर मधून चेतन तुपे आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT