Watermelon  esakal
नाशिक

Nashik News : बदलेल्या वातावरणाचा फळपिकांना फटका

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : तालुक्यासह कसमादे परिसरात पंधरा दिवसापासून वातावरणात मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. ऊन-सावलीच्या खेळात अवकाळी पावसाचे शिडकावे येत आहेत. या पावसाचा परिणाम कसमादेतील फळपिकांवर होऊ लागला आहे. (Fruit crops affected by climate change nashik news)

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात तापमान ३५ ते ३८ अंश सेल्सिअस दरम्यान आहे. पारा ४० अंशाच्या खालीच असल्याने टरबूजांना म्हणावी तशी मागणी मिळत नसल्याने याचा थेट परिणाम विक्रीवर होत आहे.

चांगल्या प्रतीच्या टरबूजाचा भाव सात ते साडेसात रुपये किलोपर्यंत खाली आला आहे. भाव नसल्याने लहान आकाराचे टरबूज शेतकरी हात विक्री करीत आहेत. दरम्यान उत्तर प्रदेश, राजस्थानमधून टरबुजाचे अमाप पीक आल्याने कसमादेच्या टरबुजाची लाली देशांतर्गत बाजारपेठांमध्ये फिकी पडत आहे.

रमजान पर्व व उन्हाळा गृहीत धरुन कसमादे परिसरातील बहुतांशी शेतकऱ्यांनी टरबुजाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली. दरवर्षी मालेगाव परिसरात मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच पारा ४० अंशावर जातो. एप्रिलचा पहिला आठवडा संपला तरी देखील पारा ३५ अंश सेल्सिअसच्या आसपास आहे. १५ दिवसापासून वातावरणात सारखे बदल होत आहेत. ऊन-सावलीचा खेळ दिवसभर सुरु असतो. रात्री वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी बेमोसमी पाऊस होत आहे.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

वातावरण बदलाचा सर्वाधिक फटका टरबूज व खरबूज या फळांना बसला आहे. मार्चच्या दुसऱ्या आठवड्यानंतर टरबुजाचे घाऊक भाव दहा रुपयावर गेले होते. यानंतर उन्हाची तीव्रता कमी होत गेली. मागणी घटल्याने भाव कोसळले. चांगल्या प्रतिचा टरबूज सात ते साडेसात रुपये किलोने घाऊक व्यापारी खरेदी करीत आहेत. साधारण व मध्यम प्रतीच्या टरबूजचा भाव चार ते पाच रुपये किलोपर्यंत आहे. भाव नसल्याने अनेक शेतकरी स्वतः टरबुजाची हातविक्री करीत आहेत.

शहरालगत महामार्गावर तसेच शहरातील मुख्य रस्ते व चौकात ट्रॅक्टर, टेम्पोतून शेतकरी टरबुजांची विक्री करीत आहेत. व्यापारी दोन किलोच्या खाली माल घेत नाहीत. शेतकऱ्यांना हा माल मिळेल त्या किमतीत बाजारात विकावा लागत आहे. शेतकरी दहा ते वीस रुपये नगाप्रमाणे टरबुजाची विक्री करीत आहेत. यातून खर्च देखील निघत नाही. बदललेल्या वातावरणामुळे खरबुजाचे भावही ४०० वरुन २५० ते ३०० रुपये कॅरेटवर आला आहे.

"उन्हाळ्यात ५५ ते ६० दिवसात टरबुजाचे पीक येते. बदललेल्या वातावरणामुळे पिकाची वाढ होण्यासाठी ७० दिवसाचा कालावधी लागत आहे. उत्तरप्रदेश, राजस्थानमध्ये टरबुजाचे पीक मोठ्या प्रमाणावर आहे. तेथून दिल्ली बाजारात माल नेण्यासाठी वाहतूक खर्च कमी लागतो. त्यामुळे व्यापाऱ्यांचा कसमादेतील टरबूज खरेदीकडे कल कमी आहे. किरकोळ बाजारात शेतकऱ्यांना मातीमोल किमतीत माल विकावा लागत आहे." - दिलीप जाधव, टरबुज उत्पादक, रावळगा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: "भाजपचा नोट जिहाद सुरु"; विनोद तावडे प्रकरणावर ठाकरेंची कडवी प्रतिक्रिया

Virar : क्षितीज ठाकूर यांनी दाखविलेल्या डायऱ्यांमध्ये नेमके काय? नावांपुढे लिहिले...

Chandrakant Tingare: माजी नगरसेविका रेखा टिंगरे यांचे पती चंद्रकांत टिंगरेंवर हल्ला! पुण्यातील वडगावशेरीत घडली घटना

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'नंतर निर्मात्यांनी केली नव्या सिनेमाची घोषणा ! 'या' कलाकारांच्या मुख्य भूमिका

Latest Marathi News Updates : रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांचा पायी प्रवास

SCROLL FOR NEXT