Crime News esakal
नाशिक

Nashik News : फळविक्रेता शिरोडे आत्महत्याप्रकरणी 21 संशयितांवर अवैध सावकारीचा गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

सातपूर : सातपूर विभागातील विश्‍वासनगर येथील शिरोडे कुटुंबातील वडील व दोन मुलांनी वेगवेगळ्या खोलीत आत्महत्या केल्याप्रकरणी प्रतिभा शिरोडे यांच्या फिर्यादीवरून सातपूर पोलिसांनी सुमारे २१ संशयितावर अवैद्य सावकार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.

सातपूर परिसरातील दीपक शिरोडे, मोठा मुलगा प्रसाद व लहना राकेश शिरोडे या तिघांनी रविवारी (ता. २९) दुपारी तीन ते साडेतीनच्या दरम्यान घरी कुणीच नसताना घरात गळफास आत्महत्या केली. (Fruit seller Shirode suicide case Crime of moneylender against 21 suspects Ten suspects arrested Some suspects escape Nashik News)

शिरोडे यांच्याकडे सापडलेल्या चिठ्ठी व काही उसनवार घेतलेल्या पैशाबाबत नोंदीनुसार प्रतिभा शिरोडे यांच्या फिर्यादीवरून रात्री उशिरा सावकारी अधिनियमाप्रमाणे सुमारे २१ संशयिताविरुद्ध सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.शिरोडे यांच्यावर बँकेचे ३९ लाख, तर सावकारांचे सुमारे ३० लाखांचे कर्ज होते.

यांच्याविरुद्ध झाला गुन्हा दाखल

भास्कर सोनवणे, मुकेश भास्कर सोनवणे, एम. आर. धामणे, राजाराम काळे, मुकेश बी. लोहार, शातांराम नागरे (रा. पिंपळगाव), संजू पाटील, शेखर पवार, प्रकाश गोन्हे, नलिनी शेलार, बाविस्कर साहेब, कैलास गोराणे, भूषण चौधरी, गरीब नवाज, भरत पाटील, किरण बोडके, गिरीश खटोड, मुरली पाटील, अरुणा पाटील, आकाश इगंळे, शरद पिंगळे आदींवर गुन्हा दाखल झाला.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

यांची कारागृहात रवानगी

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी घटनास्थळी पाहणी करीत संशयितांचा शोध घेण्याचे आदेश तपासी यंत्रणेला दिले होते. तपासी यंत्रणेने भास्कर ओमकार सोनवणे (वय ५४), मुकेश भास्कर सोनवणे (३०, रा. फ्लॅट नं. ८ प्रथमेश अर्पाटमेंट, श्रमिकनगर, सातपूर), संजय सज्जन पाटील (४६, रा. द्वारकादीश रो. हा., शिवाजीनगर, सातपूर), प्रकाश विठ्ठल गोन्हे (२६, रा. साई हाइटस् फ्लॅट नं. ०७, श्रमिकनगर, सातपूर), मुरलीधर रावण पाटील (४८, रा. शैलेश टियर रेसिडेन्सी फ्लॅट नं. ६, खुटवडनगर), किरण दामोदर बोडके (३१, रा. पिंपळगाव बहुला, ता. नाशिक), भरत वंजी पाटील (४४, रा. फ्लॅट नं. ०८ दुर्गाई सोसायटी, प्रगती शाळेसमोर, अशोकनगर, सातपूर), गिरीश प्रकाशचंद्र खटोड (४०, रा. फ्लॅट नं. ०२ सम्राट वृंदावन सोसायटी, औरंगाबाद नाका आडगाव, नाशिक), शरद गोविंद पिंगळे (४४, रा. कृष्णा रो-हाउस नं. ०७, राधाकृष्णनगर, अशोकनगर, सातपूर), शेखर सुरेश पवार (३२, रा. रूम नं. ५, ओमकार संकुल, शिवशक्ती चौक, शिवाजीनगर, सातपूर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT