Fugitive since year on parole Accused arrested from Ambad  esakal
नाशिक

Nashik Crime News : पॅरोलवरील वर्षापासून फरार आरोपीला अटक

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आरोपी गेल्या एप्रिल २०२२ मध्ये पॅरोल रजेवर कारागृहाबाहेर आला. (Fugitive since year on parole Accused arrested from Ambad nashik news)

परंतु ४५ दिवसांनंतर तो परतलाच नाही. वर्षापासून फरार असलेला आरोपी अंबड हद्दीतील दत्तनगरमध्ये दडून बसलेला असल्याची माहिती मिळताच गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाने त्यास अटक केली आहे.

अनिल ऊर्फ आमिन भुलईकुमार भोई (३८, मूळ रा. ओडिसा) असे आरोपीचे नाव आहे. भोई याच्याविरोधात मुंबईतील चेंबूर पोलिस ठाण्यात २००६ मध्ये खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात त्यास शिक्षा झाली असून, नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात तो शिक्षा भोगत होता.

दरम्यान, गेल्या ६ एप्रिल २०२२ रोजी त्यास ४५ दिवसांची पॅरोल रजा मंजूर झाली होती. त्यामुळे तो मध्यवर्ती कारागृहाबाहेर सुटला होता. परंतु, पॅरोल रजेची मुदत संपल्यानंतर त्याने पुन्हा नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात हजर होणे अपेक्षित होते. मात्र तो परतलाच नाही. त्यामुळे याप्रकरणी पुण्यातील शिरूर पोलिस ठाण्यात आरोपी भोईविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हेही वाचा : सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

दरम्यान, नाशिक शहर गुन्हेशाखेच्या गुंडाविरोधी पथकाला आरोपी भोई नाशिकमध्येच लपून असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार, गुंडाविरोधी पथकाने अंबड हद्दीतील दत्तनगर परिसरामध्ये सापळा रचून शनिवारी (ता. ८) रात्री आरोपी भोई यास अटक केली. त्यास नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, गुन्हेशाखेचे उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहायक आयुक्त वसंत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, सहायक उपनिरीक्षक गुंजाळ, हवालदार डी. के. पवार, आडके, सावकार, कैलास चव्हाण, दिनेश धकाते, संदीप आंबरे, बाळासाहेब सोनकांबळे, सचिन पाटील, गणेश नागरे यांनी सदरची कामगिरी बजावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT