विकास गामणे : सकाळ वृत्तसेवा
Nashik ZP News : केंद्र सरकारकडून प्राप्त चौदाव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यासाठी डिसेंबर २०२३ अखेरची मुदत देऊनही ग्रामपंचायतस्तरावर निधी खर्च झालेला नाही.
दुसरीकडे पंधराव्या वित्त आयोगाकडून प्राप्त झालेल्या निधीचीही अशीच अवस्था आहे.(Fund of 279 crores of 15th Finance Commission unspent of nashik zp news)
त्यामुळे मायबाप सरकार विकासकामांसाठी निधी देत असले, तरी ग्रामीण संस्था मात्र निधी खर्चात कमी पडत असल्याचे वास्तव ‘सकाळ’च्या पाहणीत समोर आले आहे. केंद्र सरकारच्या आयोगाकडून ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांसाठी निधी दिला जातो. ग्रामपंचायतीच्या लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार निधीचे वाटप होते. चौदाव्या वित्त आयोगाचा निधी केंद्र सरकारने थेट ग्रामपंचायतींना वितरित केला.
मात्र, पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी वितरणात केंद्र सरकारने धोरणात्मक बदल करताना जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या तीन स्तरावर निधीचे वितरण केले. ग्रामपंचायतींना ८० टक्के, जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी दहा टक्के निधी दिला. पंधराव्या वित्त आयोगाचा ग्रामपंचायत स्तरावर आतापर्यंत ५८ टक्के निधी खर्च झाला. रुपयात मोजताना ग्रामपंचायतस्तरावर जवळपास ६३८ कोटी ५८ लाख निधी मंजूर झाला.
त्यापैकी ३९९.२१ कोटी निधी खर्च झाला. जवळपास २७९.५२ कोटी निधी अखर्चित आहे. निधी खर्चासाठी मार्च २०२४ पर्यंत मुदत आहे. परंतु लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होणार असल्याने ४२ टक्के निधी खर्च करताना ०.५ टक्के निधी खर्चासाठी ग्रामपंचायतींना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. उपलब्ध वेळ लक्षात घेता निधी खर्च होणार नाही, त्यामुळे निधीच्या पहिल्या हप्त्याला मुकावे लागेल, अशी स्थिती आहे.
८१ हजार कामे अपूर्ण
ग्रामपंचायतींना निधी मंजुरीनंतर १५ तालुक्यांत एक हजार ३८४ ग्रामपंचायतींमध्ये ८५ हजार ६२९ कामे मंजूर झाली. त्यापैकी केवळ चार हजार २५८ कामे डिसेंबर २०२३ अखेर पूर्ण झाली. ८१ हजार ३७१ कामे अद्यापही अपूर्ण आहेत.
तालुकानिहाय निधी खर्च (कोटी रुपयात)
तालुका उपलब्ध निधी झालेला खर्च शिल्लक निधी टक्केवारी
चांदवड ४२.५१ २१.९९ २०.९१ ५०
देवळा २६.५१ १३.८१ १२.५६ ५२
त्र्यंबकेश्वर २७.५ १३.९८ १२.४४ ५२
नाशिक ४०.३६ २१.१८ १८.१९ ५३
येवला ४४.१६ २४.८९ २०.८ ५४
इगतपुरी ४४.२९ २३.९० १९.२२ ५५
पेठ १९.६३ १०.८९ ८.२१ ५६
बागलाण ६५ ३७.९ २७.३५ ५७
मालेगाव ७४.५१ ४४.३४ ३०.२६ ५९
दिंडोरी ६०.१७ ३५.४४ २३.४६ ५९
कळवण ३८.५५ २३.१७ १४.३२ ६१
नांदगाव ३५.४१ २१.९६ १३.१४ ६२
सिन्नर ५५.८३ ३४.९७ २०.८२ ६२
सुरगाणा २८.९८ १८.३३
१०.७६ ६२
निफाड ८०.५७ ५३.२० २७.७१ ६५
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.