Nashik News : केंद्र शासनाच्या अखत्यारित असलेल्या कॅन्टोन्मेंट बोर्ड व महापालिका हद्दीत मुलभूत विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सरोज अहिरे यांनी दिली. (Fund of 5 crore approved for basic development works in Deolali nashik news)
देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत विकासकामांचा आराखडा केंद्र शासनाकडून मंजूर होत असतो. त्यामुळे मुलभुत सोयी-सुविधा पुरवण्यात अडचणी होत असल्याने राज्य शासनातर्फे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मात्र महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर त्यास स्थगिती आली होती.
आमदार अहिरे यांनी पुन्हा एकदा पाठपुरावा करुन नाशिक महापालिका हद्दीत अडीच कोटी व कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत अडीच कोटी असा एकुण पाच कोटींचा निधी मंजूर करून आणला. त्यामुळे या भागात प्रलंबित कामे मार्गी लागणार आहेत.
हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार
महापालिका हद्दीतील विकासकामांमध्ये देवळाली गाव मारुती मंदिर सभामंडप, चेहेडी बुद्रुक गाव अंतर्गत रस्ते, चाडेगाव मारुती मंदिर सभामंडप, वडनेर गाव अंतर्गत रस्ते, पिंपळगाव खांब-दाढेगाव रस्ता या कामांसाठी प्रत्येकी पन्नास लाख रूपये मंजूर झाले आहेत. तसेच, देवळाली कॅन्टोन्मेंट हद्दीतील विकास कामांमध्ये नागझिरा नाला ते भगूर बस स्थानक रस्ता सुधारणा (१ कोटी) व वार्ड ५, वार्ड ७ व वार्ड ८ मधील अंतर्गत रस्ते कामासाठी प्रत्येकी पन्नास लाख रूपये मंजूर झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.