Zilla Parishad Primary School Khadangli. esakal
नाशिक

Nashik News : खंडागळीला विकासकामांसाठी 70 लाखांचा निधी मंजूर : सरपंच शीला कोकाटे

आमदार माणिकराव कोकाटे, जि. प.च्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या प्रयत्नांना यश

सकाळ वृत्तसेवा

सिन्नर (जि. नाशिक) : आमदार माणिकराव कोकाटे जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे यांच्या प्रयत्नातून सिन्नर तालुक्यातील खडांगळी येथे विविध विकासकामांसाठी सुमारे ७० लाखांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती सरपंच शीला कोकाटे यांनी दिली.

सतीश सोमनाथ कोकाटे व सतीश गोविंद कोकाटे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलला ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामस्थांनी एकहाती सत्ता दिल्यानंतर येथे विकासाचे वारे वाहू लागले.

दोन वर्षांत गाव व शिवारात विकासकामे होण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य मंडळाने केलेल्या प्रयत्नांना आमदार माणिकराव कोकाटे व जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सीमंतिनी कोकाटे यांनी प्रतिसाद देत अनेक विकासकामे मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले.

या वर्षीही सतीश गोविंद कोकाटे व सतीश सोमनाथ कोकाटे यांच्या नेतृत्वाखाली सरपंच शीला कोकाटे, उपसरपंच रंगनाथ कोकाटे, सागर कोकाटे, कल्पना ठोक, शरद कोकाटे, आशा ठोक यांनी आमदार कोकाटे यांच्याकडे विकासकामांसाठी पाठपुरावा केला होता.

त्यातून जनसुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमीत पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी दहा लाख, जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला संरक्षक भिंत बांधण्यासाठी तीन लाखांचा निधी मंजूर झाला.

तसेच राज्य शासनाच्या रोजगार हमी योजनेतून दशक्रिया विधी परिसर, लक्ष्मीमाता मंदिर परिसर व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी प्रत्येकी दहा लाख, तर विष्णू कोकाटे जुने घर ते शरद गंगाधर कोकाटे घर रस्ता व शरद गंगाधर कोकाटे ते नवनाथ गेणू कोकाटे घर या दोन रस्त्यांसाठी प्रत्येकी १० लाख रुपये, वस्ती शाळा दुरुस्तीसाठी ५ लाख, दशक्रिया विधी परिसरात २.५ लाख रुपये निधी मंजूर झाला.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

खडांगळी गावाला प्रथमच एकावेळी ७० लाखांचा निधी मंजूर झाल्याने लक्ष्मण कोकाटे, बबन कोकाटे, सुभाष ठोक, सुभाष कोकाटे, बाळासाहेब कोकाटे, अनिल कोकाटे, ज्ञानेश्वर ठोक, मच्छिंद्र कोकाटे, नवनाथ ठोक, रवींद्र ठोक, दत्तात्रय कोकाटे, भास्कर ठोक, विलास ठोक आदींसह ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

जिल्हा परिषद शाळेचे रूपडे पालटणार

खडांगळी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या पटांगणात पेव्हर ब्लॉक बसवण्यासाठी दहा लाख, तर संरक्षक भिंतीसाठी तीन लाखांचा निधी मिळणार आहे.

प्रार्थनेच्या मैदानावरील धुळीचा त्रास विद्यार्थ्यांना होत असल्याने पेव्हर ब्लॉक काम मंजूर करून आणले आहे. त्यातून शाळेचे रूपडे पालटण्याबरोबरच विद्यार्थ्यांनाही धुळीपासून दिलासा मिळणार आहे. शिवाय वस्तीशाळा दुरुस्तीसाठीही पाच लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

"ग्रामस्थांनी तरुणांच्या हाती सत्ता दिली असून, सर्व सदस्य गावविकासाठी प्रयत्न करत आहे. दोन वर्षांत एक कोटीपेक्षा जास्त विकासकामे मंजूर झाली आहेत. भविष्यात आणखी विकासकामे मंजूर करून ग्रामस्थांचा विश्वास सार्थ ठरवू." - सतीश कोकाटे, पॅनल प्रमुख

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: छत्रपती संभाजीनगरमध्ये मतमोजणीसाठी भाजपचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रावर दाखल

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT