lasalgaon burn case.jpg 
नाशिक

लासलगाव जळीतकांड प्रकरण : 'ती'ला दिला अखेरचा निरोप!

सकाळवृत्तसेवा

नाशिक : (लासलगाव) येथील बसस्थानकात पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाले ल्या महिलेची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. शुक्रवारी (ता. 21) मध्यरात्री एकच्या सुमारास संबंधित महिलेचे निधन झाल्याचे मुंबईतील रुग्णालयाकडून घोषित करण्या त आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह मुंबईहून लासलगावला रवाना करण्यात आला. दर म्यान, शनिवारी (ता. 22) सकाळी साडेअकराच्या सुमारास येथील अमरधाममध्ये शोकाकुल वातावरणात पीडित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पोलिसां चा मोठा फौजफाटा तैनात होता. 

प्रयत्न ठरले अपयशी

गेल्या 15 फेब्रुवारीस येथील बसस्थानकात प्रेमप्रकरणातून झालेल्या वादातून झटापट होऊन संबंधित पीडित महिलेला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाला होता. त्यानंतर पीडितेला नाशिक जिल्हा रुग्णालयात व तेथून भायखळा, मुंबईतील मसिना रुग्णालया त हलविण्यात आले होते. गेल्या सहा दिवसांपासून या महिलेची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र, ती अपयशी ठरली. पीडित महिलेला वाचविण्यासाठी डॉक्‍टरांनी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, यश आले नाही. दरम्यान, या प्रकरणानंतर संबंधित संशयितांना पोलिसांनी अटक केली असून, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. 

अंत्यसंस्कारावेळी नाशिक ग्रामीणच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालाव लकर, निफाडचे पोलिस उपअधीक्षक माधव रेड्डी, जिल्हा ग्रामीण गुन्हा अन्वेषण विभागाचे के. के. पाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राजपूत, पोलिस निरीक्षक सोने, निफाडचे पोलिस निरीक्षक आर. बी. सानप, येवला ग्रामीणचे पोलिस निरीक्षक कोळी, वावीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गलांडे, सायखेडाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अडसूळ, येवल्याचे तालुका पोलिस निरीक्षक अनिल भवारी, लासलगावचे खंडेराव रंजवे व पोलिस पथक उपस्थित होते. 

हेही वाचा > VIDEO : बिनपगारी ज्ञानदान करणाऱ्या 'शिक्षकांसाठी' चक्क पुरस्कार!
 
माझ्या मुलीचे तीनही मुले लहान आहेत. त्यांच्या शिक्षणाचा व त्यानंतर नोकरीचा प्रश्‍न उभा राहणार आहे. तो प्रश्‍न शासनाने सोडवावा. आरोपीला कठोर शिक्षा करावी. पोलिसांचे आमच्या कुटुंबाला योग्य सहकार्य आहे. (पीडित महिलेचे वडील)  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Vidhansabha: ठाकरे, काँग्रेस, भाजप, पवार नाही तर 'हा' पक्ष लढवणार महाराष्ट्रात सर्वाधिक जागा!

Washim Assembly Election 2024 : युती-आघाडीला बंडखोरांचे आव्हान, वाशीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढतीचे चित्र

Latest Maharashtra News Updates : मला कोणी गाडू शकत नाही- अब्दूल सत्तार

Sharad Pawar : पवार, मुंडे यांनी बीडमधील राष्ट्रवादीतील कलह मिटवला, महायुतीच्या क्षीरसागरांना मिळाले समर्थन

Pune Crime News: पाकिटावर लिहिलं ५० हजार रुपये! आतमध्ये निघाली कागदं; पुण्यात पोलिस असल्याचा बनाव करुन सराफाची फसवणूक

SCROLL FOR NEXT