Present at the launch of 'Project Utthan' in collaboration with Indocraft esakal
नाशिक

Project Utthan : गडचिरोलीच्‍या कलाकुसरीला ‘इंडोक्रॅफिटी’चे बळ; ई-कॉमर्सवर वस्‍तूंची करणार विक्री

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : गडचिरोली व सभोवतालच्‍या भागातील कारागिरांकडून तयार केल्‍या जाणाऱ्या कलाकुसरीच्‍या वस्‍तूंची ई-कॉमर्सवर विक्री केली जाणार आहे. नाशिकचे स्‍टार्टअप असलेले इंडोक्रॅफिटी डॉट कॉम हे गडचिरोली पोलिसांच्‍या मदतीने अनोखा उपक्रम राबवत आहेत.

यामुळे गडचिरोली व सभोवतालच्‍या नक्षलप्रभावित क्षेत्रात अर्थकारणाला बळ उपलब्‍ध करून देताना रोजगारनिर्मितीचा उद्देश साधला जाणार आहे. (Gadchirolis craft is empowered by Indocraft Selling goods on e commerce project utthan nashik news)

इंडोक्रॅफिटी डॉट कॉम आणि गडचिरोली पोलिस विभाग यांच्‍यातर्फे नुकतेच गडचिरोली येथे झालेल्‍या कार्यक्रमात प्रोजेक्‍ट उत्‍थानचा प्रारंभ करण्यात आला. कार्यक्रमामध्ये ॲडिशनल डायरेक्‍टर जनरल ऑफ पोलिस प्रवीण साळुंखे, गडचिरोलीचे जिल्‍हाधिकारी संजय मीणा, पोलिस अधीक्षक नीलोप्ताल, अप्पर पोलिस अधीक्षक यतिश देशमुख, कुमार चिंता, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आर्शीवाद, नागपूरचे स्‍पेशल इन्‍स्‍पेक्‍टर जनरल संदीप पाटील, इंडोक्रॅफिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिषाल वाघ आदी उपस्‍थित होते. उपक्रमासाठी रूपल गुजराथी, चैत्राली शाहाणे, नेहा सहारन यांचे सहकार्य लाभले.

असा आहे प्रोजेक्‍ट उत्‍थान

इंडोक्रॅफिटी डॉट कॉम या ई-कॉमर्सद्वारे कलाकुसरीच्‍या विविध वस्‍तूंची जागतिक स्‍तरावरील बाजारपेठ उपलब्‍ध करताना स्‍थानिक कारागिरांना रोजगार उपलब्‍ध केला आहे. यापूर्वी रक्षाबंधनला आदिवासी महिला बचतगटांकडून पर्यावरणपुरक राखी विक्रीसाठी उपलब्‍ध केली होती.

आता प्रोजेक्‍ट उत्‍थानद्वारे गडचिरोली व सभोवतालच्‍या भागातील कारागिरांकडून बनविलेल्‍या वस्‍तूंना जागतिक बाजारपेठ उपलब्‍ध करून दिली जाईल. दुर्गम भागातून गावपातळीवर वस्तूंची पोच पोलिस विभागाचे जवान समन्वय साधतील व त्‍यानंतर इंडोक्रॅफिटीचे सदस्‍य या वस्‍तू ग्राहकांनी नोंदविलेल्‍या पत्त्यावर पोहोचविण्याची व्‍यवस्‍था करतील. ग्राहकांकडून मिळालेली संपूर्ण रक्‍कम कारागिरांना अदा केली जाईल.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

या वस्‍तूंची विक्री होणार

गडचिरोली भागात बनविलेली बांबूपासून पाण्याची बाटली, बांबूपासून बनविलेला मोबाईलचा स्‍टॅण्ड, कृष्णाची मूर्ती, सागवान लाकडापासून बनविलेल्या कलाकुसरीच्‍या वस्‍तू अशा विविध तीस वस्‍तू विक्रीसाठी उपलब्‍ध करून दिलेल्‍या आहेत.

"कारागिरांच्‍या श्रमाला किंमत देण्यासाठी आमच्‍या ई-कॉमर्स संकेतस्‍थळाला देश-विदेशातून ग्राहकांचा प्रतिसाद मिळतो आहे. सामाजिक जाणीवेतून गडचिरोलीच्‍या कारागिरांना व्‍यासपीठ उपलब्‍ध करून दिले असून, कुठलाही मोबदला न आकारता, त्‍यांचे उत्‍पन्न वाढीसाठी प्रयत्‍न केले जातील." - अभिषाल वाघ, सीईओ, इंडोक्रॅफिटी डॉट कॉम.

"नक्षलप्रभावित भागांमध्ये शासनाच्‍या योजना प्रभावीपणे पोचविण्यासाठी पोलिस विभाग नेहमीच प्रयत्‍नशील असते. प्रोजेक्‍ट उत्‍थानच्‍या माध्यमातून कारागिरांना जागतिक बाजारपेठ उपलब्‍ध होणार असून, अर्थकारण सक्षम झाल्‍याने या भागाचा विकास होण्यास मदत होईल."

- नीलोप्ताल, पोलिस अधीक्षक, गडचिरोली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024 : राहुल गांधींचं पुन्हा खटाखट... ! राज्यात महिलांसाठी महिन्याला 3,000 रुपये अन् मोफत एसटी प्रवासाची घोषणा

Bulldozer Action: ज्यांची घरे बुलडोझरने पाडली त्यांना 25 लाखांची भरपाई द्या ! योगी सरकारला सुप्रीम कोर्टाचा दणका

Maharashtra Election 2024: मविआनं जाहीर केली ‘लोकसेवाची पंचसुत्री’; ‘या’ पाच गोष्टींची दिली हमी

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलल्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर अरुणकुमार सिंग शरण

Latest Marathi News Updates live: ही निवडणूक महाराष्ट्राचं गुजरातीकरण थांबवण्यासाठी- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT