नाशिक : शहरातून जाणाऱ्या औरंगाबाद महामार्गावर ऑक्टोंबर महिन्यात झालेल्या अपघातानंतर शासनाच्या सूचनेने रेझिलिएंट इंडिया कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात जुना आग्रा रोडवरील गडकरी चौक अपघाताच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे नमुद करण्यात आले आहे. या चौकात म्हाडा कार्यालयाची इमारतीची संरक्षित भिंत वाहतुकीला अडथळा ठरत असल्याचे नमुद करण्यात आले आहे. मुंबई नाक्याकडून चांडक सर्कलकडे जाताना फॅनिंग असणे आवश्यक आहे. (Gadkari Chowk became dangerous due to encroachment of government buildings Nashik News)
हेही वाचा : असं एक गाव, जिथं जमिनीला कान लावला तरी संगीत ऐकू येतं...
औरंगाबाद महामार्गावर ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अपघातानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार रेझिलिएंट इंडिया कंपनीने पोलिसांनी अपघाताच्या दिलेल्या २८ ब्लॅक स्पॉटचे सर्वेक्षण करून महापालिकेला अहवाल सादर केला.
शहरात बाह्य रिंगरोड निर्मिती, द्वारका ते दत्तमंदिर व मिरची चौक ते नांदूर नाका दरम्यान उड्डाणपूल, शहरातील सिग्नलवर सीसीटीव्ही, गतिरोधक, व्हाइट स्ट्रीप, झेब्रा क्रॉसिंग, दिशादर्शक फलक, प्रकाशयोजना करणे, दृश्यमानता वाढविणे आदी प्रकारच्या सूचना केल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील वाहतूक बेटांचे सर्वेक्षण करताना गडकरी चौक व मुंबई नाका अपघाताच्या दृष्टीने धोकादायक असल्याचे नमुद करण्यात आले आहे. मुंबई नाका येथील मायलॉन सर्कलचा आकार कमी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
गडकरी चौकातील म्हाडाच्या इमारतीची भिंत रस्त्याच्या फॅनिंगला अडथळा ठरत असल्याने सदरची भिंत हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गडकरी चौकातील सिग्नलवर गतिरोधक, पदपथ, व्हाइट स्ट्रीप, थर्मोप्लास्टिक पेंटचे पट्टे, दिशादर्शक फलक, आदी उपाययोजना कराव्या लागणार आहेत. गडकरी चौकातील वाहतुकीला अडथळा ठरणारी संरक्षक भिंत म्हाडा कार्यालयाची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.