नाशिक : गणरायाचे हर्षोल्हासात आज आगमन होताच कुटुंबांमध्ये चैतन्य अवतरले आहे. नाशिकमधील निसर्ग टपाल तिकिटांचे संग्राहक रवींद्र वामनाचार्य यांच्याकडे तिकीटांवरील गणरायाचा अनोखा संग्रह आहे.
ते गेल्या ३५ वर्षांपासून टपाल तिकीटांचा संग्रह आहे. त्यांच्या संग्रहात थायलंड सरकारच्या तिकिटावरील गणराय अन इंडोनिशायामधील चलनी नोटेवरील गणरायाची मुद्रा गणेशभक्तांचे लक्ष वेधून घेते. (Ganesaha picture on Thailand postage ticket ganesh mudra on Indonesian currency Nashik Latest Marathi News)
भारतीय टपाल विभागाने २०१७ मध्ये भारतीय व्यंजन या तिकिटावर देशातील विविध देवतांचे प्रसाद एकत्रित आहेत. त्यामध्ये गणरायाचा मोदक, तिरुपती बालाजीचा लाडू, जगन्नाथपुरीचा नैवेद्य वरण-भात, मथुरेचा पेढा आदी प्रसाद तिकिटावर आहेत.
नवीन वर्षानिमित्त विविध राज्यातील वैशिष्ट्य दर्शविणाऱ्या बारा तिकिटांचा संग्रह श्री. वामनाचार्य यांच्याकडे आहे. या तिकिटावर जयपूर पॅलेसमधील गणपती असणारा गणेश पोलचे छायाचित्र आहे. तसेच मुंबईमधील लालबागचा राजा ला ८९ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल विशेष टपाल कव्हर प्रसिद्ध करण्यात आले होते.
त्यावरील गणरायाची सुवर्ण मुद्रा आकर्षित आहे. छत्तीसगड संस्कृती व पुरातन विभागातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या तिकिटावर बारसूर गणेश मंदिर आहे. याशिवाय पुणे गणेश फेस्टिव्हलचे टपालकार्ड श्री. वामनाचार्य यांच्या संग्रहात आहे.
"भारतीय टपाल विभागाने बुद्धीदेवता गणरायच्या विविध ‘थीम’ घेऊन तिकिटे प्रकाशित केली आहेत. अशी तिकिटे मी संग्रहित करत आहे." - रवींद्र वामनाचार्य, टपाल तिकीट संग्राहक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.