ganesh utsav 2023 ganesh idol from cow dung nashik news esakal
नाशिक

Ganeshotsav 2023 : पर्यावरणपूरक गोमय गणपतीबाप्पा! गायीच्या शेणाने दिला प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय

युनूस शेख

Ganeshotsav 2023 : ‘गोमय वसते लक्ष्मी' यातून प्रेरणा घेत गायीच्या शेणातून गणपती बाप्पांची मूर्ती साकारत जैविक ऊर्जानिर्मितीचा उपक्रम वर्मा कुटुंबीयांकडून राबविला जात आहे. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना या मूर्ती पर्याय ठरत आहेत.

गणेशोत्सवात या मूर्तीच्या स्थापनेने बुद्धीचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या गणपतीबाप्पा आणि लक्ष्मीचा एकत्र वास होत असल्याची भावना भाविकांमध्ये आहे.

भारतीय संस्कृतीत गोमातेला महत्त्व दिले जाते. गोमातेचे शेण, गोमूत्रला पूजा-विधींमध्ये स्थान दिले जाते. आयुर्वेदामध्ये त्यांचा उपयोग केला जातो. (ganesh utsav 2023 ganesh idol from cow dung nashik news)

नेमकी हीच परंपरा पुढे नेण्यासाठी गणेशोत्सवानिमित्त साकारण्यात येणाऱ्या पर्यावरणपूरक शेण आणि गोमूत्रपासूनच्या मूर्तींमधून संस्कृतीचा ठेवा पुढे नेता येणे शक्य होणार आहे. त्याच अनुषंगाने प्रेमा वर्मा यांनी गोमय गणेशमूर्ती साकारण्यास सुरवात केली आहे. त्यांनी साडेतीनशे मूर्ती साकारल्या आहेत.

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती विसर्जनानंतर नदीपात्रात विरघळत नाहीत. त्या पाण्यावर तरंगत असतात, तर नदीच्या काठावर त्या पाहावयास मिळतात. मात्र गोमय मूर्तींचे पाण्यात पंधरा ते वीस मिनिटांमध्ये विसर्जन होते. घरच्या घरी केलेल्या विसर्जनात तयार होणारे खत उद्यान अथवा कुंड्यांतील रोपांना घालता येते.

गोयम मूर्ती उत्सवाच्या काळात घरात राहिल्याने कुटुंबामध्ये वातावरण प्रसन्न होत जैविक ऊर्जा प्राप्त होते. गोमयची एक मूर्ती साकारण्यासाठी तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागतो. वर्मांनी सहा इंच ते एक फुटाच्या मूर्ती साकारल्या आहेत. या मूर्तींसाठी भाविकांना सहाशे ते दीड हजार रुपये द्यावे लागणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

मूर्ती बनवण्याची प्रक्रिया

गोमयपासून पहिल्यांदा गोवऱ्या तयार केल्या जातात. त्या उन्हात पूर्णतः वाळवून कडक केल्या जातात. कुटून त्यांची पावडर केली जाते. ती पावडर चाळल्यावर निघालेल्या शेणाच्या बारीक पावडरमध्ये चुण्याचे पाणी, गोमूत्र, तुलसी, हळद वापरत त्याचा लगदा तयार केला जाततो. लगदा डायमध्ये टाकून गणपतीबाप्पाच्या मूर्तीचा आकार देण्यात येतो. वॉटर कलरने हाताने कोरीव केलेली मूर्ती आकर्षक केली जाते.

"शास्त्रशुद्ध पद्धतीने गायीच्या शेणापासून मूर्ती साकारण्याचा प्रयत्न केला आहे. गोमाता संवर्धन, तिचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न उपक्रमातून करण्यात आला आहे. मी त्यासाठी गव्यसिद्ध पदविका घेतली आहे. त्यातील गोसेवेच्या बाबींमधून अशा प्रकारच्या विविध वस्तू तयार करण्याचा मानस आहे." - प्रेमा वर्मा (मूर्तिकार)

"गायीला माता मानले जाते. गाय ही पूजनीय आणि पवित्र आहे. गायीच्या शेणात म्हणजे गोमयमध्ये महालक्ष्मीचा वास असल्याचे मानले जाते. त्यामुळे गोमय गणेशमूर्तीची पूजा करणे फायदेशीर मानले जाते. गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गणेशमूर्तीची पूजा केली जाते. सुख-समृद्धीसाठी अंगणात शेणाचा सडा टाकला जातो. त्यामुळे घरातील वातावरण शुद्ध आणि सकारात्मक राहते. ‘गोमयस्य श्रेष्ठता कारणम् श्रेष्ठत्व ज्येष्ठत्व' यासाठी गोमय पार्थिव गणपतीबाप्पाची मूर्ती केली जाते." - महंत सुधीरदास पुजारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: धक्कादायक! विरोधी उमेदवाराचा प्रचार केला म्हणून तडीपार गुंडांनी हातात कोयते घेऊन माजवली दहशत

Exit Poll : नवा एक्झिट पोल जाहीर, 175 जागांसह नवे सरकार, मुख्यमंत्री कोण होणार ?

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

Aaryavir Sehwag Double Hundred : वीरूच्या लेकाची दमदार खेळी! कुटल्या ३४ चौकार, २ षटकारांसह नाबाद २०० धावा

Gautam Adani: अदानी समुहाला आणखी एक मोठा धक्का! केनिया सरकारने रद्द केले सर्व करार

SCROLL FOR NEXT