Attractive idols of 'Shri' entered for sale in the market esakal
नाशिक

Ganeshotsav: पारंपरिक बैठकीतील मूर्तीना पसंती! शाडू पडतोय महाग, इगतपुरीसह घोटी बाजारपेठांमध्ये उत्साह

विजय पगारे

Ganeshotsav : यंदा पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी प्रशासनाचा आग्रह कायम असला, तरी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनी बाजारपेठ सजली आहे. घरातील आरास, जागा, मखराची उंची, खिशाचा अंदाज घेत मूर्ती खरेदी सुरू झाली आहे.

विशेषतः पारंपरिक बैठकीतील मूर्तींना भक्तांची पसंती आहे. गणेशोत्सव जवळ आल्यामुळे घोटी आणि इगतपुरीच्या बाजारपेठांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. (Ganeshotsav 2023 Idols preferred in traditional gatherings Shadu falling expensive excitement in Ghoti markets including Igatpuri nashik)

गणपती बाप्पाचे आगमन अवघ्या दहा ते बारा दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्याच्या स्वागतासाठी सार्वजनिक गणेश मंडळांची जय्यत तयारी सुरू आहे. गणेशमूर्ती विक्री केंद्रे सुरू झाली आहेत.

शाडू मातीच्या मूर्ती पेण, पनवेल, रायगड जिल्ह्यातून बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत. तीनशे रुपयांपासून पुढे या मूर्तींची विक्री होत आहे.

लालबागचा राजा, दगडूशेठ हलवाई, सिद्धिविनायक, कमल गणेश, पेशवा, शेषधारी, बालगणेश, पगडी गणेश, बालाजी अशा बाप्पांच्या विविध आकर्षक मूर्ती ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. यंदा गणेश मूर्तींच्या किमतीत ३० ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

राज्यात विविध ठिकाणी लागू झालेल्या स्थानिक संस्था करामुळे किमतीत वाढ झाल्याचे मनोहर देवकर यांनी सांगितले. मूर्तीवर कर लागू नसला, तरी त्या तयार करण्यासाठी लागणारी माती, कच्चा माल, इतर साहित्यांच्या करात वाढ झाली आहे. मजुरी, वाहतूक खर्चात वाढ झाल्याने मूर्तीची किंमत वाढल्याचे विक्रेते सांगतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नाशिक, पेण, सावंतवाडी, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, अमरावती, नागपूर अहमदनगर येथून मूर्ती बाजारपेठेत आल्या आहेत. सालकृंत गणेश मूर्ती भाविकांच्या मनावर मोहिनी घालत आहेत. तिची किंमत प्रत्येकाच्या खिशाला परवडेल अशी नाही.

काही ठिकाणी गणेशमूर्तींना कुंदन, ‘आय लॅशेस’, ‘कुंदन वर्क’ची सजावट करून देण्यात येत आहे. यादसाठी त्याची किंमत आकारली जात आहे. बहुतांश कला केंद्रामध्ये मूर्तींची आगाऊ नोंदणी पूर्ण होत आहे.

बाजारपेठेत ‘मार्बल फर्निचर’, ‘टेक्चर’ हा मूर्तीमधील नवीन प्रकार दाखल झाला असून, त्यासाठी जादा पैसेही मोजावे लागत आहेत.

साधारणत: अडीच हजारांपुढे या मूर्तीची विक्री होत आहे. ‘पीओपी’च्या मूर्ती ३५० रुपयांपासून ते १० हजारांपर्यंत आहेत, तर शाडूमातीच्या मूर्ती ४०० रुपयांपासून आठ ते १५ हजारांपर्यंत उपलब्ध आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Vidhansabha: गणपत गायकवाडांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या त्या महेश गायकवाडांची शिवसेनेतून हकालपट्टी

पुन्हा trump सरकार! कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा बनणार अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष, बहुमताचा आकडा केला पार

Hot Water Side Effects :  आरोग्यासाठी चांगलं असलं तरी अशा लोकांनी कधीच पिऊ नये गरम पाणी, त्रास अधिक वाढेल

Devendra Fadnavis: राहुल गांधींच्या हातातील संविधान 'लाल' का? देवेंद्र फडणवीसांनी का घेतली शंका?

Maharashtra Vidhansabha: विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भाजपचा 'कलरकोड' प्लॅन, जाणून घ्या आतल्या गोटातील बातमी

SCROLL FOR NEXT